Fungal Infections in Monsoons Do Not Neglect; मान्सून काळात सर्रास होणारे बुरशीजन्य संसर्ग, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पावसाळ्यात होणारे आजार

पावसाळ्यात होणारे आजार

बुरशी उबदार, ओलसर वातावरणात वाढते. पाऊस व दमटपणामुळे येणारा ओलसरपणा बुरशीसाठी अतिशय अनुकूल ठरतो. पावसाळ्यात कपडे नीट सुकत नाहीत, ओलसर कपडे, पादत्राणे आणि जागेत बुरशी सहज वाढते, त्यामुळे संसर्गांचा धोका वाढतो.

घरांमध्ये हवा खेळती राहत नसेल, पावसाळ्यात तुम्ही स्वतःला, स्वतःचे कपडे आणि वस्तूंना पूर्णपणे सुके ठेवू शकत नसाल तर बुरशीजन्य आजारांना आयतेच आमंत्रण मिळते. मांड्यांचा आतील भाग, चेहरा, केसांच्या खालची त्वचा आणि नितंब या शरीरावरील भागांवर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो.

बुरशीजन्य संसर्ग

बुरशीजन्य संसर्ग

टिनिया या वैद्यकीय नावाने ओळखले जाणारे बुरशीजन्य संसर्ग ऍथलिट्स फूट, जॉक इच, नायटा आणि यीस्ट संसर्ग अशा विविध स्थितींमध्ये दिसून येऊ शकतात.

हे संसर्ग कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतात. लहान मुलांना जास्त करून केसांच्या खालच्या त्वचेवर संसर्ग होतो, पुरुषांना मांड्यांचा आतील भाग, मांड्यांचे सांधे याठिकाणी तर महिलांना शरीरावर ज्या भागावर घडी पडते अशाठिकाणी बुरशीजन्य संसर्ग होतात.

(वाचा – Bleeding Gums Remedies: ब्रश केल्यावर हिरड्यांमधून येत असेल रक्त ६ घरगुती उपाय ठरतील रामबाण)

स्वच्छता आवश्यक

स्वच्छता आवश्यक

शरीरावर व्यवस्थित न बसणारे कपडे, घाम, वैयक्तिक स्वच्छता नीट न ठेवणे, ओलसर कपडे, वाढलेली आर्द्रता, रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असणे, स्टिरॉइड्सचा वापर आणि मधुमेह, केमोथेरपी किंवा एचआयव्ही यासारख्या स्थितींमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त वाढते.

हायपरपिगमेंटेशन, फोड, सूज येणे, त्वचा लालसर होऊन खाज सुटणे अशा स्वरूपात त्वचेवरील बुरशीजन्य संसर्ग दिसून येतात. मान्सून काळात सर्वात जास्त प्रमाणात होणारे काही सामान्य बुरशीजन्य संसर्ग पुढील प्रमाणे आहेत.

(वाचा – १२ वर्षाच्या मुलाचे कार अपघातात डोकं झाले शरीरापासून वेगळे, ऑपरेशन करून जोडल्याचा अद्भुत चमत्कार)

सेबोरेहिक डर्मेटायटिस

सेबोरेहिक डर्मेटायटिस

बॅक्टेरियाची वाढ, दमटपणा आणि ओलसर त्वचा यामुळे पावसाळ्यात एक्जिमाचा त्रास तीव्र होतो. जर तुम्हाला आधी कधी सेबोरेहिक एक्जिमा किंवा सेबोरेहिक डर्मेटायटिस झाला असेल तर पावसात भिजणे टाळा.

(वाचा – शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खा या पिठाची चपाती, केवळ २ खाल तर पोट राहील भरलेलं)

पायांना होणारे संसर्ग

पायांना होणारे संसर्ग

ऍथलिट्स फूट हा एक सामान्य संसर्ग आहे जो पायावर, खास करून बोटांच्या मधल्या जागेत होतो. पावसाळ्यातील ओलसरपणा बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो. ऍथलिट्स फूट होऊ नये यासाठी, आपले पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा आणि अतिशय घट्ट, पायांना अजिबात हवा लागणार नाही अशी पादत्राणे घालणे टाळा.

नखांना होणारे संसर्ग

नखांना होणारे संसर्ग

पावसाळ्यात नखांना बुरशीजन्य संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते. नखांमध्ये अडकून राहणारी घाण जंतूंना आकर्षित करते व नखांना संसर्ग होण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच नखे स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे. खासकरून जर तुम्हाला ऍथलिट्स फूट असेल तर तुम्ही नखांच्या स्वच्छतेकडे नीट लक्ष दिलेच पाहिजे.

टिनिया क्रूरिस आणि कॉर्पोरिस

टिनिया क्रूरिस आणि कॉर्पोरिस

पावसाळ्यात सर्रास होणारा आणखी एक संसर्ग नायटा, जो सामान्यतः पाय, मान आणि हातांच्या काखांमध्ये होतो. ओले कपडे जर बराच काळ अंगावर राहत असतील तर त्यामुळे देखील नायटा होऊ शकतो. हा संसर्ग टाळण्यासाठी, सैल, आरामदायी कपडे घालावेत ज्यामुळे शरीराला सर्वत्र हवा लागत राहील.

टिनिया कॅपिटिस

टिनिया कॅपिटिस

टिनिया कॅपिटिस ही बुरशीजन्य संसर्ग आहे, जो केसांखालील त्वचा, दाढी, भुवया आणि पापण्यांवर होतो. ही बुरशी केसांच्या कूपांमध्ये निर्माण होते व त्यानंतर संपूर्ण टाळूवर पसरते. जर तुम्ही ग्रूमिंग किंवा हेयरकेयर साधने इतरांसोबत शेयर करत असाल तर ही बुरशी पसरू शकते, ही बाब इतर बुरशीजन्य संसर्गांमध्ये आढळून येत नाही. संसर्ग झाला तर तो भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे गरजेचे आहे.

कशी घ्यावी काळजी

कशी घ्यावी काळजी

पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळतो पण बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोकादेखील असतो. आर्द्रता व दमटपणा बुरशी निर्माण होण्यासाठी व पसरण्यासाठी कारणीभूत ठरतो. मान्सून काळात होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गांविषयी माहिती असेल आणि ते होऊ नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय केल्यास आपण आजारांचा धोका कमी करू शकतो.

चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणे, स्वतःला कोरडे ठेवणे, ज्यामधून हवा खेळती राहील असे आरामदायी कपडे घालणे आणि पायांची चांगली काळजी घेणे असे उपाय करून आपण बुरशीजन्य संसर्गांपासून स्वतःला वाचवू शकतो

  • तरीही काही आणीबाणी उद्भवली तर जवळच्या डॉक्टरकडे जावे. वेळेत आणि सतत उपचार मिळत राहावेत यासाठी पूर्णकालीन तज्ञ सेवा जिथे उपलब्ध आहेत अशा वैद्यकीय सुविधांची निवड करावी
  • मान्सूनचा आनंद नक्की घ्या, पण स्वतःची नीट काळजी देखील घ्या, संसर्गांपासून लांब राहा. लक्षात ठेवा, थोडीशी नीट काळजी घेतली तर तुम्ही बुरशीजन्य संसर्गांपासून स्वतःचा बचाव अवश्य करू शकाल. कोरडे राहा, निरोगी राहा!

[ad_2]

Related posts