What is menopause its stages and menopause symptoms how to manage after age 40; मेनोपॉज म्हणजे काय, रजोनिवृत्तीच्या ३ स्टेप्स कोणत्या प्रत्येक महिलेला माहीत हवेच

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेनोपॉजची सुरूवात कधी होते?

मेनोपॉजची सुरूवात कधी होते?

मेनोपॉज हा साधारण महिलांना वयाच्या ४५ नंतर सुरू होतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र अनेकदा ४० व्या वर्षापासूनही याची सुरूवात होते. ज्याला Premature Menopause असे म्हटले जाते. हे सर्वस्वी महिलांच्या अनुवंशिकतेवर आणि त्यांच्या आयुष्य जगण्याच्या स्टाईलवर हे अवलंबून असते.

मेनोपॉजमुळे काय होतेचे लक्षण आणि संकेत

मेनोपॉजमुळे काय होतेचे लक्षण आणि संकेत

Mayo Clinic ने दिलेल्या अहवालानुसार, रजोनिवृत्ती एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. मात्र त्याचे संकेत आणि लक्षणं हे आधीपासूनच दिसू लागतात. यामध्ये हॉट फ्लॅशेसचे लक्षण सर्वाधिक दिसून येते. तसंच भावनिकदृष्ट्या महिलांवर अधिक परिणाम होताना दिसतात.

तसंच शारीरिक ऊर्जा कमी होते. मेनोपॉजचा भावनांवर नकारात्मक परिणामही होताना दिसतो. मात्र जीवनशैलीत बदल केला तसंच हार्मोन थेरपीमुळे यावर तुम्ही नियंत्रण आणू शकता. त्याआधी मेनोपॉजची लक्षणे जाणून घ्या.

(वाचा – वजन वाढल्याने त्रस्त असाल तर प्या वासयुक्त पदार्थाचा चहा, उपाशीपोटी प्यायल्याने वजन येईल सर्रकन कमी)

मेनोपॉजचे लक्षण आणि संकेत

मेनोपॉजचे लक्षण आणि संकेत
  • अनियमित मासिक पाळी येणे
  • व्हजायनल ड्रायनेस
  • हॉट फ्लॅशेस
  • रात्री घाम येणे
  • झोप न येणे
  • सतत मूड बदलत राहणे
  • वजन वाढणे
  • मेटाबॉलिजम कमी होणे
  • कोरड्या त्वचेची समस्या
  • अधिक प्रमाणात केसगळती
  • हृदयाचे ठोके वाढणे
  • सतत डोकेदुखी होणे

(वाचा – पावसाळ्यात सर्रास होणारे बुरशीजन्य संसर्ग, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान)

मेनोपॉजच्या किती स्टेज असतात?

मेनोपॉजच्या किती स्टेज असतात?

WebMD ने दिलेल्या अहवालानुसार, मेनोपॉजच्या ३ स्टेज असतात, पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्टमेनोपॉज

पेरीमेनोपॉज – यामध्ये मासिक पाळी अनियमित होते, मात्र पूर्ण बंद होत नाही. अधिक महिलांमध्ये साधारण ४७ व्या वर्षी ही स्टेज निर्माण होते. यामध्ये हॉट फ्लॅशेसचे लक्षण दिसून येते. मात्र तरीही महिला गर्भधारणा करू शकतात

मेनोपॉज – जेव्हा शेवटी मासिक पाळी येते त्याला मेनोपॉज असं म्हणतात. या अवस्थेत हॉट फ्लॅशेस, व्हजायनल ड्रायनेस आणि झोप न येणे ही लक्षणे अधिक प्रमाणात दिसतात

पोस्टमेनोपॉज – जेव्हा महिलांचा शेवटचा मेनोपॉजचा काळ असतो आणि शेवटची मासिक पाळी येते. जर महिलांना मेनोपॉजमुळे १ वर्षापेक्षा अधिक मासिक पाळी आली नाही, मात्र त्यानंतर ब्लिडिंग झाले तर हे नॉर्मल नाही. त्यानंतर त्वरीत डॉक्टरांना भेटावे

(वाचा – Bleeding Gums Remedies: ब्रश केल्यावर हिरड्यांमधून येत असेल रक्त ६ घरगुती उपाय ठरतील रामबाण)

मेनोपॉजची लक्षणे कशी कमी करावी

मेनोपॉजची लक्षणे कशी कमी करावी

तुम्हाला हॉट फ्लॅशन, रात्री घाम येणे, झोप न येणे अथवा डोकेदुखी इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी. आपल्या डाएटमध्ये केवळ पौष्टिक आहाराचा समावेश करून घ्यावा.

अधिक मसालेदार, कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. रोज व्यायाम करा आणि स्मोकिंग, दारूचे सेवन करू नका. तसंच रात्री झोपताना सैलसर कपडे घाला.

डॉक्टरांकडे कधी जावे

डॉक्टरांकडे कधी जावे

वर दिलेल्या लक्षणांपेक्षा अधिक वेगळी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांकडे जावे. तसंच तुम्हाला अधिक त्रास होत असेल. मेनोपॉजनंतरही ब्लिडिंग होत असेल तर डॉक्टरांना याबाबत सांगावे आणि योग्य औषधोपचार करावेत. अशावेळी डॉक्टर कोलोनोस्कॉपी, मेमोग्राफी अथवा ट्रायग्लिसराईड स्क्रिनिंग, थायरॉईड टेस्ट करायला सांगू शकतात.

[ad_2]

Related posts