5 Disadvantages Of Sleeping With Thick Pillow May Cause Neck Pain To Spin Problems; जाडीसर उशी घेऊन झोपायची आहे का सवय? वेळीच सोडा नाहीतर व्हाल या त्रासाचे शिकार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मानेचा त्रास

मानेचा त्रास

रात्री झोपताना मोठी उशी अथवा दोन उशा डोक्याखाली ठेवल्याने अनेक आजार उद्भवतात. सर्वात पहिला आजार म्हणजे मानेचा त्रास. उशी ठेवल्याने मानदुखी सतत चालू राहाते. यासाठी तुम्ही नेहमी लहान उशी अथवा अत्यंत मऊ उशीचा वापर करावा. उशीशिवाय झोपण्याची सवय अधिक चांगली ठरते.

मणक्याचा त्रास

मणक्याचा त्रास

अनेकांना तरूण वयातच मणक्यात गॅप येण्याचा अथवा मणक्यात कळा येण्याचा त्रास सुरू होतो. याचे मूळ कारण सुरू होते ते म्हणजे डोक्याखाली मोठी उशी घेऊन झोपणे. मोठी उशी घेतल्याने मणक्याच्या हाडांवर परिणाम होतो. मोठ्या उशीच्या वापरामुळे आपल्या मणक्यातील हाडांमध्ये अनेक बदल होतात, ज्यामुळे पाठदुखीचा त्रासही उद्भवतो.

(वाचा – ६ पदार्थ जे रक्तात मिसळवतात युरिक अ‍ॅसिड, दोन्ही किडनी होतील निकामी ठरेल जीवघेणे)

मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम

मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम

मोठ्या उशीचा परिणाम हा मेंदूतील रक्तप्रवाहावरही होतो. त्यामुळे ही सवय तुम्ही त्वरीत सोडावी. जाडसर उशीवर झोपल्यामुळे मेंदूपर्यंत नीट रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे केसांनाही योग्य पोषण मिळत नाही. यामुळे केसगळती प्रमाणही वाढते आणि त्याशिवाय त्वचाही खराब झालेली दिसून येते.

(वाचा – तुम्हीही सकाळी उठून पिताय का खूप पाणी? योग्य की अयोग्य काय आहे आयुर्वेदाचा सल्ला)

खांदा आणि हातदुखी

खांदा आणि हातदुखी

अनेकजण सकाळी उठल्यानंतर हातामध्ये त्रास होत असल्याची तक्रार करतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे जाडसर उशीवर डोकं ठेऊन झोपणं आहे. अनेकांना दोन उशांवर डोकं ठेवत झोपायची सवय असते. पण यामुळे खांद्याची हाडे खेचली जातात आणि त्यामुळे हातामध्ये दुखण्याचा त्रास सुरू होतो.

(वाचा – महिलेच्या पोटातून आल्या असह्य कळा, डॉक्टरांनी सांगितले केवळ २४ तासच जगशील आणि पुढे झाले असे काही…)

मानसिक त्रास

मानसिक त्रास

जाडसर उशी घेतल्याने सतत कूस बदलण्याची सवय लागते आणि त्यामुळे झोपमोडही होते. झोप खराब झाल्याने ताणतणाव वाढतो आणि ताणतणाव अधिक वाढू लागला की दिवसभर काम करण्याची इच्छा होत नाही. तसंच अपूर्ण झोपेमुळे मानसिक त्रास वाढतो आणि चिडचिडही वाढते.

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3076923/

https://health.clevelandclinic.org/is-your-pillow-hurting-your-neck-7-tips-for-better-sleep/

https://www.spine-health.com/wellness/sleep/pillows-different-sleeping-positions

[ad_2]

Related posts