( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gold River Swarnrekha: भारतात अनेक अशा छोट्या-मोठ्या नद्या आहेत ज्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. अनेक राज्यातील शेतकरी शेतीसाठी नद्यांच्या पाण्यावर अलवंबून असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा नदीबाबत सांगणार आहोत तीचे वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. भारतातून एक अशी नदी वाहते ज्यातील पाण्यातून चक्क सोनं वाहत येते. तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नदीतून वाहत येणारे सोने मिळवण्यासाठी रहिवाशी पहाटेपासूनच धडपड करतात.
झारखंडमध्ये ही नदी असून स्वर्णरेखा असं या नदीचे नाव आहे. या नदीमुळं अनेकांचा रोजगार चालतो. वाहत्या पाण्यातून येणारे सोने गोळा करुन लोक ते विकतात आणि त्यातून पैसे कमवतात. गेल्या कित्येक वर्षांपासून असाच उदरनिर्वाह ते चालवत आहेत. नदीमुळंच त्यांची कमाई होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र या नदीत सोने येते कुठून हे गूढ मात्र कायम आहे. नदीत सोनं कसं येते याबाबत कोणालाच काही माहिती नाही.
नदीत सापडणाऱ्या या सोन्याविषयी शास्त्रज्ञांनीही संशोधन केले मात्र त्यांना कोणतीच माहिती मिळाली नाही. नदीत सापडणारे सोने हे एकप्रकारचे गूढ असल्याचं बोललं जाते. स्वर्णरेखा नदी झारखंडमधून वाहते. नदीतून सोने वाहत येत असल्याने या नदीला स्वर्णरेखा हे नाव पडले. ही नदी रांचीपासून जवळपास 16 किमी लांब असून 474 किमी लांब आहे. उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशामधील काही भागातून ही नदी वाहते. त्याचबरोबर स्वर्णरेखा नदीची उपनदी असलेली करकरी नदीतही सोनेचे कण सापडतात.
सोन्याचे कण करकरी नदीतून वाहून स्वर्णरेखा नदीत येतात, अशी लोकांची मान्यता आहे. मात्र, या दोन्ही नद्यांमध्ये सोन्याचे कण कसे येतात हे मात्र अद्याप रहस्य आहे. हजारो वर्षांनंतरही अजून हे गूढ उकलले नाहीये. भूवैज्ञानिकांच्या मते, नदी अनेक दगडाच्या कपारीतून वाहत येते. त्याचवेळी पाण्याचे आणि दगडाचे घर्षण होते. त्यावेळी सोन्याचे कण यात मिसळतात आणि वाहत येतात. मात्र, नदीच्या या पाण्यातून सोने मिळवणे हे अत्यंत कठिण काम असते. यासाठी खूप मेहनत करावी लागते. हे कण तांदळाऐवढे किंवा त्याहूनही छोटे असतात.
झारखंडमध्ये काही अशा जागा आहेत. जिथे स्थानिक आदिवासी नदी किनारी भल्या पहाटेच जातात आणि दिवसभर नदीच्या रेतीतून सोन्याचे कण गोळा करतात. ते त्यांच्या अनेक पिढ्यांपासून हे काम करतात. येथील तमाड आणि सारंडा परिसरातील पुरुष, महिला आणि मुलंदेखील सकाळीच नदीतून सोनं काढण्यासाठी जातात.