Viral Video : धावत्या स्कूटीवर ‘पापा की परी’चा डान्स, स्वत: सोबत इतरांच्या जीवाशी खेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Girl Dancing On Bike Viral Video : सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्मवर जिथे काही सेकंदात तोही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचू शकता. इंटरनेटवर बाइक, स्कूटर स्टंट करणारे या तरुणांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना यांना कोणाचीही काळजी वाटतं नाही. हे बेजबाबदार तरुण अगदी रस्त्यावरुन अशी बाइक चालवतात की, इतर वाहन चालकांचं त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटतं. (viral girl dancing on bike video Trending on social google news latest trends)

बाइकस्वारांनी कट मारला म्हणून अनेकांचा निरपराधांचा बळी गेला आहे. अगदी स्टंटबाजी करणाऱ्यांचाही यात जीव गेला आहे. रस्ते वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करुन ही लोकं सगळ्यांचा जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियावर नुकताच एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

ही पापा की परी स्कूटीवर स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता दिवसाढवळा ही तरुणी धावत्या स्कूटीवर डान्स करते आहे. तुम्ही पाहू शकता या रस्त्यावर असंख्य गाड्यांची ये जा सुरु आहे. ही तरुणी जेव्हा रस्त्यावरुन जाताना धावत्या स्कूटीवर हात सोडून डान्स करत आहे. 

एका क्षणाला गाडी एका बाजूलाही जाते पण ती गाडीवर नियंत्रण घेते. या तरुणीच्या या कृत्यामुळे रस्त्यावरील असंख्य लोकांचा जीव तिने धोक्यात घातला होता.  स्वत:च्या जीवासोबतच तिने इतरांच्या जीवाशी खेळ केला. 

या तरुणीच्या पाठी मागे एक कारचालक जात होता. त्याला तरुणीचं हे कृत्य पाहून धक्का बसला आणि त्याने आपल्या कॅमेऱ्यात तिचं डान्स कैद केला.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हा व्हिडीओ गुजरातमधील नवसारी इथल्या असल्याचं बोलं जातं आहे. दरम्यान सोमवारी सोशल मीडियावर दोन तरुणींच्या धावत्या बाइकवर स्टंट करतानाचा व्हिडीओ ताजा असताना हा दुसरा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Related posts