वृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : अमेरिकेतील (amercia) विस्कॉन्सिन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विस्कॉन्सिन येथील एका वृद्ध महिला शिक्षिकेला न्यायालयाने तब्बल 600 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 74 वर्षीय महिला शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार (physical abuse) केल्यामुळे इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे. या महिलेने 14 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या तळघरात नेऊन एकदा नव्हे तर अनेक वेळा अत्याचार केले होते. त्यामुळे न्यायालयाने या महिलेला 600 वर्षांची शिक्षा सुनवली आहे. इतक्या मोठ्या शिक्षेमुळे ही महिला सध्या चर्चेत आहे.

एनी एन नेल्सन नावाच्या महिला शिक्षिकेला 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचे 25 वेळा लैंगिक शोषण केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. एनी एन नेल्सन ही महिला टोमाह येथील एका खाजगी शाळेत शिकवत होती. 2016 आणि 2017 मध्ये तिने विद्यार्थ्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी ही महिला शिक्षिका 67 वर्षांची होती. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाची सुनावणी केवळ तीन दिवस चालली. तब्बल पाच तास झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

एनी एन नेल्सनच्या तुरुंगवासाची शिक्षा 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत नेल्सनला तुरुंगात ठेवण्यात येणार आहे असे न्यायालयाने सांगितले आहे. मोनरो काउंटीचे सर्किट कोर्टाचे न्यायाधीश रिचर्ड रॅडक्लिफ यांनी नेल्सनला जीपीएस ट्रॅकर लावून सोडून दिलं आहे.

“या गुन्ह्याचा बळी पडलेला हा एक अतिशय धाडसी तरुण आहे. त्याने सत्य सांगितलं आहे आणि न्यायाधिशांनी ते मोठ्याने आणि स्पष्टपणे ऐकले आहे. सत्य शोधण्यासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल आम्ही न्यायाधिशांचे खूप आभारी आहोत,” असे असिस्टंट डिस्ट्रिक्ट अॅटर्नी सारा एम. स्किल्स यांनी सांगितले.

आणखी एका महिलेला अटक

अमेरिकेच्या डेलावेअर राज्यातही असेच एक प्रकरण समोर आले होते. डेलावेअर येथे एका महिला शिक्षिकेवर तिच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होते. महिलेने नऊ वर्षांपूर्वी तिच्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याशी दोन महिने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. सध्या महिलेला अटक करण्यात आली असून लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीड मेसर असे आरोपी महिला शिक्षिकेचे नाव आहे. ती शाळेत आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवायची. अलीकडेच, एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तिला दक्षिण कॅरोलिना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

तुरुंगातून बाहेर आलेल्या शिक्षिकेचे पुन्हा तसेच कृत्य

15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या एका महिला शिक्षिकेने तुरुंगातून तात्पुरती सुटका केल्यानंतर पुन्हा एकदा असेच कृत्य सुरू केल्याचे लंडनमध्ये समोर आले होते. शिक्षिकेने वेस्ट लंडन कौन्सिल साइटवर गेट गार्ड म्हणून तिची नवीन नोकरी सुरू केली होती. मात्र ही शिक्षिका येथेही मुलांसोबत अत्याचार करत असल्याचा दावा केला जात होता. डेलीमेलच्या वृत्तानुसार, 37 वर्षीय कँडिस बार्बरने शेतात मुलाचे लैंगिक शोषण केले होते. 

Related posts