[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दात आणि हिरड्या निरोगी आणि मजबूत असणे आवश्यक आहे. हिरड्या जर अशक्त आणि अनहेल्दी असतील तर तुम्हाला खाणे पिणे कठीण होऊ शकते, यासोबतच तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. श्वासाची दुर्गंधी, रक्तस्त्राव, दात पिवळे पडणे, थंड किंवा गरम अन्न खाताना मुंग्या येणे, पायोरिया, कॅव्हिटी, दातांमध्ये किडे होणे, हिरड्यांमधून रक्त येणे इत्यादी त्रास सर्रास होऊ शकतात.लक्षात ठेवा की तुमच्या दातांची संपूर्ण रचना हिरड्यांवर असते, याचा अर्थ हिरड्या कमकुवत झाल्यास तुमचे दात देखील कमकुवत होतात. हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने जिंजीविटिस (Gingivitis) हिरड्यांचा दाह अर्थात वेदना, पेरिओडॉन्टिटिस (Periodontitis), हिरड्यांमधून रक्तस्त्राव आणि पायोरिया (Pyorrhea) यांसारखे घातक आजार होऊ शकतात. CDC च्या मते, तुमच्या हिरड्या निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. (फोटो सौजन्य :- iStock)
[ad_2]