( प्रगत भारत । pragatbharat.com)
Amit Shah Parliament Speech : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपनं नऊ सरकारं पाडली, अशी टीका सुळेंनी लोकसभेत केली होती. अविश्वास ठरावावरील चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले होते. तेव्हा सरकार पाडण्याची पहिली सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनीच केला, असा टोला अमित शाहांनी लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
अविश्वास ठरावादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भाषणं झाली. सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर देशभरातील विविध राज्यातील सरकार पडल्याचा आोरप केला होता. विरोधी सरकारं पाडण्याचा आणि मणिपूरमधल्या कायदा युव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला टार्गेट केल होते. तर, श्रीकांत शिंदेंनी युपीएच्या काळातल्या घोटाळ्याची यादीच वाचून दाखवली होती.
मणिपूरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
मणिपूरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमधल्या लाजिरवाण्या घटनांवरून राजकारण करणं जास्त लाजिरवाणं आहे, अशा शब्दांत शाह यांनी अविश्वास ठरावावरील चर्चेच्या वेळी विरोधकांवर पलटवार केला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अविश्वास ठरावाला उत्तर देताना मणिपूर हिंसाचारावर बोलतील, असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी स्पष्ट केले. दरम्यान, मणिपूर हिंसाचाराबाबत शांततेचं आवाहन करणारा ठराव संमत करावा, अशी मागणी अमित शाहांनी केला. तर पंतप्रधानांच्या उपस्थितीत शांततेचा ठराव संमत करावा, असं मत काँग्रेस खासदारांनी यावेळी मांडलं.
2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा दावा
2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान म्हणून विजयी होतील, असा ठाम दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत केला. अविश्वास ठरावावरील चर्चेच्या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा पाढा वाचून दाखवला… राहुल गांधी आणि काँग्रेसवर त्यांनी आपल्या भाषणात राजकीय स्ट्राईक केला… एका नेत्याला 13 वेळा लाँच करण्यात आलं आणि १३ वेळा तो फेल झाला, अशा शब्दांत शाहांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
राहुल गांधींचे लोकसभेत घणाघाती भाषण
मोदी सरकारनं मणिपूरमध्ये भारतमातेची आणि भारताची हत्या केली, असा हल्लाबोल राहुल गांधींनी लोकसभेत केला. मणिपूरच्या मुद्द्यावर आक्रमक होत राहुल गांधींनी लोकसभेत घणाघाती भाषण केलं. मोदी मणिपूरच्या जनतेचा आवाज ऐकत नाहीत, ते फक्त अदानी आणि अमित शाह या दोन जणांचाच आवाज ऐकतात, सरकार संपूर्ण देश पेटवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.