PM Modi On Manipur violence: ‘मणिपूरमध्ये पुन्हा सूर्य उगवेल…’, पंतप्रधान मोदींचं देशाच्या जनतेला आश्वासन!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Parliament Speech: विरोधी पक्षाने लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज संसदेत मतदान झालं. आवाजी प्रस्तावावर अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) फेटाळला गेला. लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल 2 तास 14 मिनिटं भाषण केलं. अविश्वास प्रस्तावावरील हे आत्तापर्यंतच सर्वात मोठं भाषण होतं. या भाषणात मोदींनी सुरूवातीला मणिपूर प्रकरणावर (Manipur violence) बोलणं टाळलं. त्यावरून विरोधी पक्षाने सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर मोदींनी मणिपूरच्या विषयावर भाष्य केलं.

विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते बोलायला तयार आहेत, पण ऐकायला तयार नाहीत. ते खोटे बोलून पळून जातात, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. मणिपूरवर नुसतीच चर्चा झाली तर गृहमंत्र्यांनी पत्र देखील लिहिलं होतं, पण विरोधकांचा हेतू चर्चेचा नव्हता. त्याच्या पोटात दुखत होतं, असंही मोदी म्हणाले आहेत. गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केलं आहे. मणिपूरमध्ये न्यायालयाचा निर्णय आला. त्यांच्या बाजूने आणि विरोधाची परिस्थिती निर्माण झाली आणि हिंसाचाराचा काळ सुरू झाला, असं मोदी म्हणाले.

आणखी वाचा – अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!

मणिपूरमधील हिंसाचारामध्ये अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावावं लागलं. महिलांवार गुन्हे घडले. मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाला विश्वास असू द्या, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल, असा विश्वास मोदी यांनी देशातील जनतेला दिला आहे.

दरम्यान, राजकारणाचा खेळ करण्यासाठी मणिपूरच्या भूमिचा वापर करू नका. सत्ताधारी बाकांवरून या मुद्द्यावर समृद्ध चर्चा झाली. आपण एकत्र मिळून त्या समस्यांमधून मार्ग काढला आहे. त्यामुळे आपण एकत्र मिळून चालूया, असंही मोदी म्हणाले आहेत.

Related posts