Pyorrhea: पिवळेधम्मक दात इतके चमकतील की दिपतील डोळे, असं बनवा घरगुती मंजन, रक्त वेदना व घाण वास होईल चुटकीत दूर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुमच्या तोंडाला नेहमी दुर्गंधी येत असेल, दात घासताना रक्त येत असेल, दात आणि हिरड्या सतत दुखत असतील किंवा तुमचे पोट नेहमी खराब होत असेल तर समजून जा तुम्हाला पायोरिया आजार झाला आहे. पायोरिया ही हिरड्या आणि दातांच्या मुळांशी येणारी सूज आहे, ज्यामुळे अनेकदा दात खिळखिळे होतात. या स्थितीत हिरड्यांतून रक्तस्राव होतो. साहजिकच, हा आजार तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक तर आहेच, पण तुमच्यासाठी लाजिरवाणाही ठरू शकतो. पायोरियाच्या गंभीर प्रकरणांमध्ये तुम्हाला दातांच्या कडांमधून पू गळणे, हिरड्यांना सूज येणे, दातांची मुळे सैल होणे, पचनसंस्थेतील सेप्सिस किंवा लिव्हरचे आजार होण्याचा धोका असू शकतो. पायोरियाची कारणे काय आहेत?नॉएडाच्या ई-260 सेक्टर 27 स्थित ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे’ डायरेक्टर कपिल त्यागी यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा दात व्यवस्थित आणि नियमितपणे ब्रश केले जात नाहीत तेव्हा दातांवर बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. खाण्यापिण्यामुळे दात आणि हिरड्यांवरील चिकट कण अॅसिडमध्ये बदलतात आणि यामुळे दात किडतात आणि पायरिया आजाराला जन्म देतात. यामागची कारणे म्हणजे ब्रश न करणे, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न धुणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन इत्यादी. पायोरियाच्या उपचारासाठी तुम्ही कोणते आयुर्वेदिक घरगुती उपाय करू शकता ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts