Video :’हा तर बाहुबली!’ नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Newborn Baby Video : मुलं जन्माचा क्षण हा प्रत्येक आईसाठी अस्मरणीय क्षण असतो. बाळ निरोगी व्हावं हे प्रत्येक आईची इच्छा असते. नऊ महिने आईच्या पोटात वाढलेलं तान्हुल जेव्हा जगात डोळं उघडतं तेव्हादेखील तो आईवर अवलंबून असतो. इवल्या इवल्याशा पायांनी तो जेव्हा पोटात अशताना लाथ मारतो तेव्हा त्याच्या या नटखट कृत्याने आईचं जीव सुखावतं. (bahubali bachcha newborn baby holds tray nurses shock video viral most trending news)

बाळ जन्माला आल्यानंतर ते रडतं, त्याचा तो रडण्याचा आवाज म्हणजे तो स्वस्थ असण्याचं लक्ष असतं. अनेक हॉस्पिटलमध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्याला स्वच्छ पुसून पायाने उलट पकडलं जातं. या सगळ्या गोष्टीतून डॉक्टरांना त्याचा निरोगी असण्याचे संकेत मिळतं असतात. पण सध्या सोशल मीडियावर नवजात बाळाचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत. 

हा तर बाहुबली!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नुकतच जन्मालं आलेलं बाळ दिसतं. आईच्या गर्भातून बाहेर काढल्यानंतरही अजून त्याचं शरीर स्वच्छ करण्यात आलेलं दिसतं नाही आहे. नर्सने त्याला एका ट्रेमध्ये ठेवलं होतं. त्यावेळी या इवल्याशा जीवाचा पक्रामक पाहून प्रत्येक क्षण अवाक् झाले आहेत. 

तुम्ही पाहू शकता जेव्हा ती नर्स त्याला पायाला धरुन उचले तेव्हा बाळ इवल्या इवल्या हाताने ट्रे उचलतो. हे पाहून नर्सला धक्का बसतो. ती त्याला परत टेबरवर खाली करते आणि परत त्याला पायाने उचलते तर हे काय काही क्षणापूर्वी जन्मलेला हा बाळ दोन हाताने ट्रे उचलताना दिसतं आहे. 

चिमुकल्याचा पराक्रम पाहून नर्स आश्चयचकित होते, तेवढ्यात त्या रुममध्ये हॉस्पिटलमध्ये इतर नर्स येतात आणि तेही बाळाचा हा पराक्रम पाहून थक्क होतात. ते सगळे हसायला लागतात. तुम्ही ऐकू शकता एक महिला म्हणतेय मॅडम हा तर शक्तीमान आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत त्याला 3 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटर म्हणजे X वरील तिवारी दद्दा  या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याने लिहिलं आहे की, चांद्रयान चंद्रावर पोहोचल्यानंतर भारतात Real बाहुबली जन्मला आहे. 

त्यानंतर या व्हिडीओ कंमेंट्सचा पाऊस पडतोय. एका यूजर्सने लिहिलं आहे की, नवजात मुलाशी अशाप्रकारे वागणे चुकीचं असून तुम्ही त्याचा व्हिडीओ बनवायला नको होता. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे त्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. 

 

Related posts