( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chandrayaan-3 Mission: भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केले आहे. यानंतर विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन करत आहे. तापमानासह येथील जमीनीत असलेल्या खनिजांबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. असे असतानाच आता चंद्रावर झालेल्या भूकंपांची नोंद देखील प्रज्ञान रोव्हरने घेतली आहे.
चंद्रावर नैसर्गिक भूकंपाची नोंद
प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर आलेल्या नैसर्गिक भूकंपाची नोंद केली आहे. लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडद्वारे त्याची नोंद करण्यात आली आहे. चंद्रावर भूकंपाची घटना आढळून आल्याच ट्विट इस्रोने केले आहे. प्रज्ञान रोव्हर आणि इतर पेलोड्सनेही यासंबंधीचा डेटा पाठवला असून आता या नोंदीचे निरीक्षण केले जात आहे.
चंद्रावरील पहिल्या मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीम तंत्रज्ञानावर आधारित उपकरणाने रोव्हरच्या संशोधनाची नोंद केली आहे. चंद्रावर नैसर्गिक भूकंप झाल्याची नोंद (ILSA) पेलोडने रेकॉर्ड केली आहे. भूकंप ही एक नैसर्गिक घटना असल्याचे सांगितले जात आहे. विक्रम लँडरने पाठवलेल्या नोंदी या चंद्रावर भूकंप झाल्याच्या दर्शवात. मात्र, याचे नेमके विश्लेषण झालेले नाही.
चंद्रावर सल्फर सापडल्याचे पुरावे
चंद्रावर सल्फर असल्याचं चांद्रयान 3 नं शोधून काढलंय. रोव्हरमध्ये एसलेल्या एका एक्स रे मशीनमुळे चंद्रावर सल्फर सापडल्याचं समजलंय. रोव्हरवर असलेल्या स्पेट्रोस्कोपनं चंद्रावर सल्फर असण्याला पुष्टी दिलीय. आता चंद्रावर हे सल्फर कुठून अस्तित्वात आलं. ज्वालामुखीमुळे, उल्कापातामुळे किंवा आणखी कुठल्या कारणामुळे चंद्रावर सल्फर आढळलं, याचा अभ्यास, शास्त्रज्ञ करणार आहेत.
भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला
भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. तसंच सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचं आढळल आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातआहे. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय.. जर ऑक्सिजनपाठोपाठ हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.
चंद्रावरील तापमानाची नोंद
चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण पाठवलंय.. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवतीच्या मातीचं तापमान प्रोफाइलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस आहे. मात्र, जसं पृष्ठभागापासून खोलवर जातो तसा तापमानात बदल होतो. चंद्राच्या पृष्ठभागाच्या 8 सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे 10 अंश सेल्सिअस आहे.