Petrol and Diesel Price of be Reduced After LPG know Details;एलपीजीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकारच्या मनात काय? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Petrol and Diesel Price Cut: 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यापूर्वी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) ग्राहकांना 200 रुपये सबसिडी मिळत होती. आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजीच्या दरात कपात केली आहे, जी आज 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. पण घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया. 

इंधन किंमत प्रणाली

देशातील इंधनाच्या किमती डायनॅमिक प्रायझिंग सिस्टिमवर ठरतात. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि करन्सी एक्स्चेंज रेट हे सतत बदलत असतात. देशांतर्गत इंधनाच्या किमती जागतिक बाजारातील ट्रेंडशी जुळवून घेण्यासाठी ही प्रणाली 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि एक्सचेंज रेट्समध्ये होणारे बदल हे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

एलपीजीच्या किमतीत घट आणि त्याचा परिणाम

एलपीजीच्या किमती कमी झाल्यामुळे थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लगेच कमी होऊ शकत नाहीत. कारण एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलची पुरवठा साखळी, किमतीचे घटक आणि बाजारातील गतिशीलता वेगवेगळी आहे. एलपीजी मुख्यतः घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो, तर पेट्रोल आणि डिझेलचा वापर प्रामुख्याने वाहतूक आणि औद्योगिक कारणांसाठी केला जातो.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर कोणते घटक परिणाम करतात?
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या किंवा कमी झाल्यास अनेक गोष्टींवर परिणाम होतो. 

कच्च्या तेलाच्या किमती

जागतिक कच्च्या तेलाच्या किमती हा इंधनाच्या किमतींवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. या किमतीतील चढ-उताराचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन खर्चावर होतो.

करन्सी एक्सचेंज रेट 

भारत आपल्या कच्च्या तेलाचा महत्त्वपूर्ण भाग आयात करतो. करन्सी एक्सचेंज रेटमधील चढ-उतार झाल्यास तेल आयातीच्या खर्चावर परिणाम होतो. जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होतो तेव्हा इंधनाच्या किमती वाढतात. कारण आयात महाग होते.

कर आणि शुल्क

पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतींमध्ये केंद्र आणि राज्य कर आणि इतर शुल्क आल्याने किंमत वाढते. या कर दरांमधील कोणताही बदल अंतिम किमतींवर परिणाम करू शकतो.

कच्चे तेल शुद्धीकरण खर्च

शुद्धीकरण प्रक्रियेमुळे कच्च्या तेलाचे वापरण्यायोग्य इंधनात रूपांतर होते. मेंटनंस किंवा अॅडव्हान्स यासारखे घटक इंधनाच्या किमतींवर परिणाम करू शकतात.

एलपीजीच्या किमतीतील कपात ही ग्राहकांसाठी एक सकारात्मक बाब आहे. परंतु यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तात्काळ कमी होतीलच याची हमी नाही. भारतातील इंधनाच्या किंमतीवर जागतिक बाजारातील गतिशीलता, चलन विनिमय दर, कर आणि देशांतर्गत घटकांचा प्रभाव पडतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी कोणतीही संभाव्य कपात या विविध घटकांवर अवलंबून असेल.

Related posts