‘खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत…’ रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News : वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या देशातील खाद्यपदार्थ अनेक रेस्टारंट आपल्या आजूबाजूला असतात. घरात जेवण करण्याचा कंटाळा आला की किंवा काही खास निमित्त असल्यास आपण बाहेर जेवायला जातो. छान रेस्टारंट असेल आणि तिथलं जेवणंही आवडलं आवडलं. ज्या वेटरने आपल्या जेवण वाढलं असतं, त्याच्या कामावरही आपण खूष होऊन त्याला बक्षिण म्हणून टीप देतो. वेटरला टीप देणं ही सामान्य बाब आहे. सध्या सोशल मीडियावर एका वेटरला मिळालेल्या टीपची जोरदार चर्चा होते आहे. त्या वेटरला जे मिळालं त्यानंतर तिला धक्का बसला आहे. (viral trending news waitress left a shocking tip by a wife on couples bill)

‘खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत…’ 

 

एक कपल छान रोमँटिक क्षण घालविण्यासाठी जेवण्यासाठी एका छान रेस्टारंटमध्ये जातात. तिथे अतिशय चविष्ट जेवण झाल्यानंतर महिलेने त्या वेटर महिलेला टीपमध्ये जे दिलं ते पाहून सगळे अवाक् झाले आहेत. त्या ग्राहक महिलेने स्वतः त्या टीप बद्दल सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांकडून वादाला तोंड फुटलं आहे. या ग्राहक महिलेने त्या वेटरला टीप म्हणून एक पत्र दिलं आहे.  त्या महिलेने बिलावर तिला काहीतरी लिहून दिलं आहे. जे वाचून वेटर महिलेला धक्का बसला आहे. तिने लिहिलं आहे की,  “माझ्या पतीला प्रिये म्हणणे बंद करा”.  खरं तर ही त्या वेटरसाठी धमकीच होती. हे पत्र शेअर करताना ती महिला कॅप्शनमध्ये लिहिते की, ”या वेटरसाठी हीच योग्य टीप आहे.” 

या पोस्टनंतर सोशल मीडियावर वादंग उठला आहे. काही लोकांनी त्या ग्राहक महिलेला मत्सरी वृत्तीची म्हटलं आहे. तर काही यूजर्सने वेटरला चुकीचं ठरवलं आहे. एका यूजर्सने लिहिलं आहे की, अशाप्रकारचे टीप देणं बंद करायला पाहिजे. रेस्टॉरंट हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगला पगार देते. टीप देणं बंद केल्यास वेटर महिलांचा कोणत्याही व्यक्तीकडून असा अपमान होणार नाही. 

एका युजर्सने म्हटलं आहे की, “दक्षिण यूएस मध्ये, प्रत्येकाला हनी, स्वीटी, प्रेयसी म्हणतात आणि माझी वैयक्तिक आवडती ‘साखर’ आहे. दुसरा यूजर्स म्हणतात, तुम्हाला माहिती आहे मला तर वेटरकडून किती वेळा हनी, स्वीटी, स्वीटहार्ट म्हटल्या गेलं आहे ते? त्यामुळे एखाद्या महिलचं वेटरसोबत असं वागणं हे चुकीचं आहे. 
 

Related posts