50 राज्यात 100 गर्लफ्रेंड तरी याला अजून सापडलं नाही खरं प्रेम

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral News : प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं…. असं म्हणत कवी मंगेश पाडगावकर यांनी अगदी गमतीशीर पद्धतीने प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. खंर प्रेम म्हणजे काय असतं असा प्रश्न विचारल्यास वेगवेगळी उत्तर मिळतील. काही जण सांगतात त्यांन खरं प्रेम मिळाले तर काही जण अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहेत. अमेरिकेतील असाच एक तरुण ज्याने   50 राज्यातील 100 मुलींसोबत प्रेम सबंध ठेवले तरी त्याला अजून त्याचं खरं प्रेम सापडलेले नाही. मैथ्यू वर्निग असं या तरुणाचे नाव आहे. मैथ्यू वर्निग अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. 

न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे.  मैथ्यू वर्निग  हा अमेरिकेतील मोंटाना येथील रहिवासी आहे.  अजूनही खरं प्रेम न मिळाल्यामुळे लग्न थांबले आहे. अजूनही मी खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे असं  मैथ्यू वर्निग यांनी सांगितले.  मैथ्यू वर्निग हा लग्नासाठी मुलगी शोधत आहे.

100 मुलींना डेट करुन स्वत:ला बॅचलर समजतो

खऱ्या प्रेमाच्या शोधात मैथ्यू वर्निग याने आता पर्यंत 100 मुलींना डेट केले आहे. मैथ्यू वर्निग  अमेरिकेतील प्रत्येक राज्यातील दोन मुलींना डेट केले आहे. मैथ्यू वर्निग  याच्या जवळपास 100 गर्लफ्रेंड होत्या तरीही देखील तो  स्वत:ला बॅचलर समजतो.

अशा बनवल्या 100 गर्लफ्रेंड

स्वत:ला बॅचलर सजणाऱ्या मैथ्यू वर्निग याने विविध ऑनलाईन डेटिंग App वरुन 100 गर्लफ्रेंड बनवल्या. 2020 या वर्षात लॉकडाऊन असताना मैथ्यू वर्निग याने त्याच्या स्वपानातील राजकुमारीचा शोध सुरु केला. त्याने  ऑनलाईन डेटिंग App वरुन अनेक तरुणींशी मैत्री केली. असा प्रकारे त्याने 100 गर्लफेंड बनवल्या. त्याने त्याच्या या सर्व गर्लफ्रेंजसोबत वेळ देखील घालवला. 

खरं प्रेम शोधण्यासाठी देशभर फिरला

खऱ्या प्रेमाच्या शोधात मैथ्यू वर्निग देशभर फिरला. ऑनलाईन डेटिंग App वरुन ओळख झालेल्या तरुणींना भेटण्यासाठी तो त्यांच्या राज्यात जात होता. अशा प्रकारे मैथ्यू वर्निग याने खऱ्या प्रेमाच्या शोधात देशभर फिरला.  मैथ्यू वर्निग जवळपास 100 तरुणींसह रिलेशनशिपमध्ये होता. 

प्रत्येक गर्लफेंडसोबतची डेट अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न

मैथ्यू वर्निग याचा प्रत्येक गर्लफेंडसोबतची डेट अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न होता. यामुळे त्याने अनेक तरुणींसह  जिप लाइनिंग, पॅरासेलिंग, हेलीकॉप्टर राईड, घोडेसवारी, पॅडलबोर्डिंग, पेंटबॉलिंग आणि एयर बोटिंग सारख्या थ्रीलींग एक्टीव्हीटी देकील केल्या. मात्र, त्याच्या अपेक्षा पूर्ण करणारी एकही तरुणी अद्याप  मैथ्यू वर्निग याला सापडलेली नाही. 

 

Related posts