भूकंपाच्या काही क्षण आधी मोरक्कोत दिसला होता रहस्यमय प्रकाश; नैसर्गित आपत्ती की आणखी काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Strange Lights Recorded During Morocco earthquake: मोरक्कोमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळं झालेल्या मोठी जिवितहानी झाली आहे. भूकंपातील मृतांचा आकडा 3 हजारांवर गेला आहे. एटलस डोंगररांगेत भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले होते. खरं तर अफ्रिकन देशात भूकंप येण्याच्या घटना काही नवीन नाहीयेत. मात्र, गेल्या तीन दशकातील हा सर्वात विनाशकारी भूकंप होता. भूकंपानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात काही वेगळाच दावा करण्यात आला आहे. भूकंपाच्या काही क्षण आधी एक रहस्यमयी प्रकाश दिसला होता, असा दावा करण्यात येतोय. हा नक्की काय प्रकार आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे की कोणीतरी घडवून आणलं आहे का, अशा शंका समोर येत आहेत. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेऊया. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर ही नैसर्गिंक आपत्ती नसून घडवून आणलेला भूकंप असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एखाद्या हायटेक लॅबमधून हे कारस्थान करण्यात आलं आहे. तर काहींनी अमेरिकेच्या मिलिट्री प्रोगॅम HAARP (हार्प) कडे बोटं दाखवलं आहे. अलास्कामध्ये असलेली वेधशाळात एक अमेरिकन संस्था आहे. यात रेडिओ ट्रान्समीटच्या मदतीने वातावरणात बदल केले जातात नंतर त्याचा अभ्यास करण्यात येतो. 2022मध्ये या अनेक मोठे प्रोजेक्टवर काम सुरु करण्यात आलं होतं. मात्र, त्यामुळं भूकंप आणता येऊ शकतो का, हे सांगण्यात आले नव्हते. जगात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींसाठी अनेकदा हार्पला संशयाच्या फेऱ्यात अडकला होता. अनेक देशात आलेल्या भूकंप, त्सुनामी आणि भूस्लखनासाठी ही रिसर्च संस्थेला दोषी ठरवण्यात आले होते. 

फेब्रुवारीमध्ये तुर्की व सिरीयामध्ये भूकंप झाला होता. त्यात मृताची संख्या 23 हजारांपर्यंत गेली होती. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यात आभाळात निळ्या-पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला होता. तर, भूकंपाच्या दरम्यान वीजदेखील कोसळली होती. भूकंपाच्यावेळी वीज कोसळणे हे असामान्य आहे कृत्रिमरित्या भूकंप आणण्यात आला होता, व यात अमेरिकेचा हात आहे, असा आरोप करण्यात आला होता. 

मोरक्कोमध्ये दिसलेल्या प्रकाशाचा अर्थ काय

मोरक्कोमध्ये आलेला भूकंप ही नैसर्गिक घटना होती की कृत्रिमरित्या घडवण्यात आला होता यावर चर्चा होत असतानाच नेमका तो प्रकाश काय होता हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या प्रकाशाला अर्थक्वेक लाइट असं म्हटलं जातं. ज्यावेळेस भूकंप येतो तेव्हा हा प्रकाश दिसतो. जमिनीपासून आकाशापर्यंत हा प्रकाश दिसतो. 

जमीनीच्या आत भूकंपामुळं होणारा इलेक्ट्रोमॅग्निटिक करंट निर्माण करतात. जेव्हा जमिनीखालील टॅक्टोनिक प्लेट  एकमेकांवर आदळतात किंवा फुटतात आणि त्यांच्या खालून बाहेर पडणारी उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते, त्यामुळे भूकंप होतो. भूकंपाच्या आधी अनेकवेळा असा रहस्यमय प्रकाश पाहिल्याचे सांगितलं जातं. इतकंच काय तर 17व्या शतकात ही नैसर्गिक आपत्तीच्या आधी रहस्यमयी प्रकाश पाहिल्याच्या नोंदी आढळतात. 

Related posts