तुम्ही बँकेकडून घेऊ शकता 15 प्रकारचे Loan; लगेच पाहून घ्या संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bank Loan : एखादी महागडी वस्तू, घर, वाहन घेण्यासाठी कधीकधी एखाद्या कामासाठी किंवा मग शिक्षणासाठी बँकांकडून कर्ज घेतले गेल्याचं तुम्ही पाहिलंच असेल. थोडक्यात अडीनडीच्या वेळी आणि आर्थिक संकटांमध्ये अडकलेलं असताना ही बँकच तुम्हाला मोठी मदत करते. इथंही बँकेतून कर्ज घ्यायचं झालं तर, कर्जाचे काही ठराविक प्रकारच आपल्याला ठाऊक असतात. पण, असेही काही प्रकार आहेत जे तुमच्या आर्थिक गरजा भागवतात हे तुम्हाला माहितीये का? 

बँकांकडून दिलं जाणारं विविध प्रकारचं कर्ज… 

पर्सनल लोन
बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या कर्जातून मिळणाऱ्या पैशांचा वापर तुम्ही कुठंही करू शकता तुमची मिळकत आणि क्रेडिट स्कोअर तपासून हे कर्ज दिलं जातं. 

बिजनेस लोन
एखादा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी हे कर्ज मोठ्या मदतीचं. इथं तुम्ही बँकेकडे काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणं अपेक्षित असतं. 

सॅलरी अॅडवांस लोन 
बँकेकडून ग्राहकांसाठी सॅलरी अॅडवांस लोनही ग्राहकांना दिलं जातं. यामध्ये पगाराचे पैसे आगाऊ मिळतात. अडचणीच्या वेळी बँकेची ही सुविधा मदतीची ठरते. 

कोलॅटरल लोन 
संपत्तीचा काही भाग, एफडी किंवा सोनं गहाण ठेवून तुम्हाला हे कर्ज घेता येतं. 

मेडिकल लोन
रुग्णालयातील खर्चापासून आजारपणावरील उपचारांपर्यंतचा खर्च या लोनमधून करता येतो. वैद्यकिय कारणांसाठी बँक हे लोन देते. 

वेडिंग लोन
तुम्ही लग्न करण्याचा बेत आखत आहात आणि तिथं तुम्हाला पैशांची चणचण भासतेय, तर अशा वेळी बँक तुम्हाला कर्ज देते. या पैशांतून तुम्ही वेन्यू बुकिंग, कॅटरिंग, डेकोरेशन असे खर्च करु शकता. 

ट्रॅवल लोन 
आश्चर्य वाटेल, पण भटकंतीसाठीही तुम्हाला बँक कर्ज देते. तुम्हीही कुठं फिरण्याचा बेत आखत असाल तर बँक यासाठी कर्ज देऊ करते. या पैशांतून तुमचा फ्लाईट खर्च, व्हिसा, वास्तव्याचा खर्च भरून निघतो. 

एज्युकेशन लोन
बँकेकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीसुद्धा कर्ज दिलं जातं. यामध्ये शालेय, महाविद्यालयीन शिक्षण खर्च, परदेशातील शिक्षण असे खर्च समाविष्ट असतात. 

रेनोवेशन लोन 
घराची डागडुजी किंवा अशा इतर कामांसाठीही तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. 

शॉर्ट टर्म लोन 
बँकेकडून दिल्या जाणाऱ्य़ा या सवलतीमुळं तुम्हाला अचानक ओढवलेल्या संकटातून सावरणं शक्य होतं. या कर्जांवर व्याजदर जास्त असतो. त्यामुळं हे एक अनसिक्योर्ड पर्सनल लोन आहे. 

गोल्ड लोन 
बँकेकडून ग्राहकांना गोल्ड लोन दिलं जातं. जिथं तुम्ही सोनं गहाण ठेवून बँकेकडून कर्जाऊ पैसे घेऊ शकता. हे कर्ज बाजारभावाच्या 70 टक्के असतं. 

वरील कर्जांशिवय बँक ग्राहकांना रिपेअरिंग लोन, यूज्ड कार लोन, होम लोन, ऑटो लोन, क्रेडिट कार्ड लोन ऑफर करतात. प्रत्येक बँका त्यांच्या व्य़ाजदरांनुसार ही कर्ज देऊ करतात. त्यामुळं इथून पुढं वारेमाप खर्च करताना आर्थिक चणचण भासल्यास योग्य कर्ज निवडा आणि बँकेची मदत नक्की घ्या. 

Related posts