( प्रगत भारत । pragatbharat.com)
IAS Save Child Life in Flight: झारखंडची राजधानी रांचीहून दिल्लीला येणाऱ्या विमानात जन्मत: हृदयरोगाचा (Heart Problem) त्रास असलेल्या एका सहा महिन्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली. तिला श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची अवस्था पाहून पालक घाबरले, त्यांनी ही गोष्ट विमातील क्रु मेंबरला सांगितली. मुलीची तब्येत जास्तच बिघडत चालल्याचं पाहून विमानातील क्रु मेंबरने आपातकालीन घोषणा केली, विमानात एखाद्या डॉक्टर प्रवास करत असेल तर मदतीसाठी पुढे यावं अशी घोषणा त्यांनी केली. घोषणा ऐकताच विमानातील दोन प्रवासी पुढे आणि त्यांनी देवदूत बनून मुलीचा जीव वाचवला.
आयएएस अधिकारी बनला देवदूत
मुलीचा जीव वाचवणाऱ्या प्रवाशांमध्ये एक होते IAS अधिकारी डॉ. नितीन कुलकर्णी (Dr Nitin Kulkarni) आणि दुसरे रांचीतल्या हॉस्पीटलचे डॉक्टर मोजम्मिल फिरोज आहेत. दोघांनी प्रयत्न करुन मुलीवर प्राथमिक उपचार केले. डॉ. नितीन कुलकर्णी यांनी वैद्यकीय अभ्याक्रमाचंही शिक्षण घेतलं आहे, सध्या ते झारखंच्या राज्यपालांचे मुख्य सचिव आहेत.
मुलीला दिला ऑक्सिजन सपोर्ट
एका तासानंतर विमान नवी दिल्लीत उतरवण्यात आलं. विमानतळावर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं होतं. विमान उतरताच वैद्यकीय पथकाने मुलीला ऑक्सिजन सपोर्ट दिला आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीला जन्मत:च ह्दयाची समस्या असल्याने तिचे पालक तिला उपचारासाठी दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) घेऊन जात होते.
ही सर्व घटना इंडिनोच्या (Indigo) विमानात घडली. विमानाने रांची विमानतळावरुन उड्डान घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच मुलीची तब्येत बिघडली. त्यामुळे विमानात काही काळ आपातकालीन परिस्थिनी निर्माण झाली. क्रु मेंबरने घोषणा केल्यानंतर डॉ. नितीन कुलकर्णी आणि डॉ. मोजम्मिल फिरोज यांनी पुढे येत मुलीची जीव वाचवला.
आपातकालिन प्रसंग
डॉ. नितीन कुलकर्णी यांनी विमानातल्या त्या प्रसंगाबद्दल माहिती दिली. मुलीला श्वास घेण्यास त्रास सुरु झाल्यावर मुलीची आई जोरजोराने रडू लागली. विमानात असलेला ऑक्सिजन मास्क मोठ्या माणसांसाठी होता. पण डॉ. कुलकर्णी आणि डॉ. फिरोज यांनी जुगाड करत सर्वात आधी मुलीला ऑक्सिजन दिला. त्यानंतर पालकांच्या किटमध्ये असलेलं इंजेक्शन तिला दिला. त्यामुळे मुलीच्या तब्येतीत काही प्रमाणात सुधारणा झाली. डॉ. कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीचे 15-20 मिनिंट खूप महत्त्वाची होती. त्यावेळेत मुलीला तात्काळ मदत मिळाल्याने मुलीचा जीव वाचू शकला.
सोशल मीडियावर कौतुक
इंडिगो विमानातील ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉ. नितीन कुलकर्णी आणि डॉ. फिरोज यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.