ऐन सणासुदीत सोन्याला झळाळी; इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं भाव वाढले, वाचा आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Price Today: रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं अद्यापही जग सावरले नाहीये, असं असतानाच आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं सर्वसामान्यांवर परिणाम होण्याचे संकेत दिले जात आहेत. युद्धाचा परिणाम आता सोन्या चांदीच्या बाजारावरही दिसून येण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसांत सोने महागणार अशी स्थिती सध्या उद्भवली आहे. 

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.  कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या मागणीत तेजी दिसून आली आहे. सोने आणि चांदीच्या भावात 1-1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,460 रुपये इतका झाला असून चांदीचा भावही 700 रुपये वाढला आहे. कमोडिटी मार्केटमध्ये चांदीचा भाव 68,880 रुपये इतका आहे. 

जागतिक बाजारपेठेत गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीचे भाव उतरले होते. कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा दर 20 डॉलरने वाढून 1865 डॉलर प्रति औन्सपर्यंत झाला आहे. तर चांदीची किंमतीतदेखील 1 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये चांदीचा भाव 21.93 डॉलर प्रति ऑन्सपर्यंत पोहोचला आहे. 

युद्धाचा परिणाम सोन्या आणि चांदीच्या बाजारावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत देशात सणा-उत्सवांना सुरुवात होणार आहे. याकाळात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. ग्राहकांना ऐन सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

22 कॅरेट सोन्याचा भाव

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईत 53,350 रुपये, गुरुग्राममध्ये 53,300 रुपये, कोलकातामध्ये 53,350 रुपये, लखनौमध्ये 53,300 रुपये प्रतिग्रॅम इतका आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 1.12 टक्क्यांना वाढून 57,510 रुपये प्रति ग्रॅम इतका झाला आहे. त्या व्यतिरिक्त निफ्टी इंडेक्स 1.44 टक्क्यांनी वाढून 69,154 रुपये प्रति किलो इतकी आहे. 

Related posts