Navratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ! कुष्मांडा देवीची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shardiya Navratri 3rd Day 2023 : शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस हा माता शक्तीच्या चौथं रुप म्हणजे माता कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची चौथी माळही कुष्मांडा देवीला समर्पित असते. या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केलं होतं असं म्हणतात. या देवीला पिवळा रंग आवडतो ती सिंहावर स्वार असून तिला आठ हात आहे असं तिचं रुप आहे. तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा असते. तर आठव्या हातात. सर्व सिद्धी आणि निधीची जपमाळ पाहिला मिळते.मालपु्आ हे या देवीचं आवडतं नैवेद्य आहे. माता कुष्मांडाची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया. (shardiya navratri 2023 day 4 maa kushmanda shubh muhurat puja vidhi bhog mantra and navratri 4th day colors Wednesday)

बुधवारचा रंग आणि चौथी माळ 

बुधवारचा गडद निळा रंग असणार आहे. केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलांची माळ

कुष्मांडा देवीची पूजा

कुष्मांडा देवीच्या पूजेत कुंकू, तांदूळ, सुपारीची पाने, केशर आणि श्रृंगार इत्यादी गोष्टींचा अपर्ण करा. याचबरोबर पांढरा भोपळा किंवा कुम्हारा असल्यास तो देवीला अतिशय प्रिय आहे. नंतर दुर्गा चालिसा पाठ करुन तुपाचा किंवा कापूर लावून देवी कुष्मांडाची आरती संपन्न करा. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुलं, जास्वंद किंवा गुलाबाचं फूल आवर्जुन अर्पण करावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले गेलं आहे. कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवल्यास ती प्रसन्न होते. यामध्ये दही, साखर आणि फुटाण्याचा समावेश तुम्ही करु शकता. 

कुष्मांडा देवीचं महत्त्व

देवी कुष्मांडा तिच्या भक्तांना रोग, दुःख आणि विनाशापासून मुक्त करते, अशी मान्यता आहे. ती भक्तांना कीर्ती, सामर्थ्य आणि बुद्धी प्रदान करते असं म्हणतात. 

कुष्मांडा देवीचा मंत्र:

ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

या देवी सर्वभू‍तेषु माँ कृष्माण्डा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

किंवा 

“या देवी सर्वभू‍तेषु मां कुष्मांडा रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:”

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts