Snake Viral Video : भयानक! महिलेने सापाचं चुंबन घेतलं अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Woman Kisses Snake Viral Video : सापाचं नाव घेतलं तरी आपले ततफफ होतं. पण या महिलेने तर चक्क सापाला किस केली. त्यानंतर सापाने त्याचा रौद्रअवतार दाखवल्यानंतर जे काही घडलं त्या क्षणाचा व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन सरकरते. साप, अजगर या विषारी प्राण्यांचा नादी लागायचं नसतं. त्यांचा एक दंश आपल्याला मृत्यूचा दाढीत घेऊन जातो. बिळातून साप जेव्हा बाहेर येऊन मानवी वस्तीत येतात. तेव्हा सर्पमित्र त्यांना पकडून परत जंगलात सोडतात. पण आपल्यासारखी माणसं साप हा शब्द ऐकून पांढरी पडतात. 

भयानक व्हिडीओ 

परदेशात प्राण्यांसोबत साहसी खेळ खेळण्याचे अनेक प्रकार आपण पाहिले आहे. रोहित शेट्टीची प्रसिद्ध मालिका Khatron Ke Khiladi Season 13 हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये आपण पाहिले आहेत त्यातील स्पर्धेक भल्या मोठ्या अजगर सापासोबत स्टंट करताना दिसतात. या शोमध्ये दाखवण्यात येणारे प्राणी हे पाळीव असून त्यातील स्टंट हे पूर्ण तज्ज्ञांच्या देखरेखे खाली केले जातात. सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग होत असलेल्या सात सेकंदच्या व्हिडीओमध्ये एका महिलेला सापासोबत केलेला स्टंट चांगलाच महागात पडला आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता निळ्या रंगाच्या टिशर्ट घातलेल्या व्यक्तीच्या हातात विषारी साप आहे. त्याचा बाजूला एक महिला उभी आहे. या भयानक व्हिडीओमध्ये ती महिला अचानक सापाला किस करायला जाते. महिलेचं हे कृत्य सापाला आवडलं नाही वाटतं. कारण पुढच्या सेकंदाला साप तिला जास्त जोरात ओठांवर चावा घेतो.तिच्या शेजारी अजून एक महिला उभी असल्याच दिसून येतं आहे. सापाच्या या हल्ल्यानंतर ती बाजूला होते. 

तो साप महिलेचे ओठ धरुन ठेवतो. सर्पमित्र त्या महिलेची सुटका करताना या व्हिडीओमध्ये दिसून येतं. आहे महिलेला सापाला किस करण्याचा नाद चांगलाच महागात पडलायचं दिसतंय. सापाच्या हल्लेतून महिलेची सुटका करताना सर्पमित्रांना कठीण जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरवर CCTV IDIOTS या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.  (Woman Kisses Snake horribly Video Viral on Internet Social Media Trending Now)

वारंवार सांगण्यात येतं कुठल्याही प्राण्याचा नादी लागू नये. खास करुन जंगली प्राण्याशी तर अजिबात नाही. पण तरीदेखील काही जण अतिधाडस दाखवतात आणि मृत्यूला निमंत्रण देतात. 

Related posts