[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
वटपौर्णिमा करण्याचे आरोग्यदायी कारण
वटपौर्णिमा ही नेहमी पावसाळ्याच्या दिवसात येते. साधारण पाऊस सुरू झाला की वटपौर्णिमेचा सण असतो आणि या काळात वातावरण बदलामुळे अनेकदा आजाराचे प्रमाण वाढते. या आजारांपासून दूर राहाता यावं यासाठी वडाच्या झाडाचा फायदा करून घेण्यात येतो. त्यामुळेच वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा केली जाते.
ऑक्सिजन अधिक मिळते
वडाच्या झाडातून २४ तास ऑक्सिजन मिळते. पूर्वी घराबाहेर महिला पडत नव्हत्या. वडाच्या झाडाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना ऑक्सिजन अधिक मिळायचा आणि आजारांपासून दूर राहण्यास मदत व्हायची. आजही प्रदूषणाच्या या जगात वडाच्या झाडापासून ऑक्सिजन मिळाल्यास, अधिक ताजे, प्रसन्न राहण्यास मदत मिळते.
(वाचा – नाभीमध्ये तेल घालणे किती ठरते फायदेशीर, कोणत्या आजारासाठी कोणत्या तेलाचा कराल वापर)
गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाचा उपयोग
महिलांच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग होतो असं सांगण्यात येतं. तसंच योनीमार्गातील इन्फेक्शन दूर करण्यासाठीही वडाच्या सालीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. याशिवाय ज्यांना रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शचाही त्रास आहे त्यांनी वडाच्या सालीचा उपयोग करून घ्यावा.
(उलटे चालण्याचे फायदे माहीत आहेत का? १५ मिनिट चालण्याने पोटावरची लटकलेली चरबी होईल गायब)
वडाप्रमाणे सांभाळावे आरोग्य
वडाच्या झाडाचे आयुष्य अधिक असते. वडाचं झाड हे प्रतिकात्मक असून याचे मूळ खोलवर पसरलेले असते. वडाच्या मुळांचं नातं जसं मातीशी घट्ट राहातं तसंच आरोग्याशी घट्ट नातं राहावं आणि आरोग्य वडाप्रमाणेच चांगलं राहावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
(वाचा – Rajinikanth यांनी ३२ वर्षात ५ पदार्थांना लावला नाही हात, जाणून घ्या डाएट सिक्रेट)
[ad_2]