Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी ‘महासंयोग’! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhanteras / Ravi Pushya Yoga 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आज लक्ष्मी, गणेशासह भगवान कुबेराची पूजा केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात आज धन्वतंरीची पूजा करतात. भगवान कुबेर हा संपत्तीची देवता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करुन घरात सुख समृद्धीसोबत कायम संपत्तीचा वास राहावा म्हणून पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल 400 वर्षांनंतर धनत्रयोदशीला शुभ योग, धन योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र सकाळी 07:57 ते 10:29 पर्यंत सुरू होते. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग सकाळी 07:57 पासून रात्रीपर्यंत असणार आहे. या दुर्मिळ योगायोगमुळे 4 राशींना जबदरस्त फायदा होणार आहे. (400 years after dhanteras Maha Sanyog Due to Dhan and Shani Pushya Nakshatra yoga 4 zodiac signs will benefit from Kubera treasure)

वृषभ रास (Taurus Zodiac) 

धनत्रयोदशीला हा शुभ योग तयार होत असल्याने वृषभ राशीच्या लोकांवर कुबेराची कृपा बरसणार आहे. घरात धनाचं आगमन होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होणार आहे. संपूर्ण कुटुंबात सुख-समृद्धी नांदणार आहे. 

कर्क रास  (Cancer Zodiac)   

कर्क राशीच्या लोकांना धनत्रयोदशीच्या दिवशी तयार होणाऱ्या या शुभ योगाचा फायदा होणार आहे. पूर्वी रखडलेल्या योजनांना आता गती मिळणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला असेल, तेही गुंतवणूक करणे तुम्हाला अधिक फायदेशीर ठरणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)

भगवान कुबेर देखील कन्या राशीच्या लोकांवर प्रसन्न राहणार आहे. तो त्यांच्यावरही संपत्तीचा वर्षाव करणार आहे. नोकरदार लोकांची प्रगती होणार आहे. परदेशात जाण्याची शक्यता तुमच्या कुंडलीत तयार होतो आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांना धनासोबत समृद्धी प्राप्त होणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढणार आहे. नोकरदारांसाठीही हा योग शुभ ठरणार आहे. त्यांना पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्यावर कुबेरजींचा आशीर्वाद राहणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts