Diwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! ‘या’ शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Diwali 2023 Laxmi Ganesh Puja : पणतीचा उजेड अंगणभर पडू दे  लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे…हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan Shubh Muhurat) केलं जातं. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दीपोत्सव. देवी लक्ष्मी, गणेश आणि देवी सरस्वती पूजा करुन वर्षभर भरपूर संपत्ती आणि समृद्धी घरी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. (Diwali Lakshmipujan 2023) 

लक्ष्मीपूजन कधी आहे?

कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात येतो. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आहे. कार्तिक अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 2:44 वाजता ते 13 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 2:56 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मातील उदय तिथीनुसार 12  नोव्हेंबर 2023 दिवाळी असून या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.  (diwali 2023 goddess lakshmi Ganesh pujan shubh muhurta puja samagri list and significance lakshmi pujan video )

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार रविवारी 12  नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी ते रात्री 8 वाजून 36 मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीमध्ये तुम्ही माता लक्ष्मीची विधीवत पूजा नक्की करा. तर महानिशीथकालचा शुभ मुहूर्त रात्री 11:49 ते 12:31 पर्यंत असणार आहे. एखाद्या शुभ मुहूर्तावर विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने खूप मोठा आर्थिक लाभ होणार आहे. 

प्रदोष काल मुहूर्त – 5:29 PM ते 8:08
वृषभ काल मुहूर्त – 5:39 PM ते 7:35

चोपडी पूजन 2023 

संध्याकाळ – 5:29 PM ते 10:26
रात्री – (13 नोव्हेंबर) 1:44 AM ते 3:24 AM
उषाकाल मुहूर्त – (13 नोव्हेंबर) 05:03 AM ते 06:42 AM

शारदा पूजन मुहूर्त 2023 

संध्याकाळ – 05:29 PM ते 10:26 PM
रात्री – (13 नोव्हेंबर) 01:44 AM ते 3:24 AM 
उषाकाल मुहूर्त – (13 नोव्हेंबर) 05:03 AM ते 06:4 2AM

काली पूजन मुहूर्त 

काली पूजा निशिता काल – (13 नोव्हेंबर) 11:39 PM 12:32 AM 

लक्ष्मीपूजन साहित्य 

लक्ष्मी, गणपती मूर्ती किंवा फोटो 
हळद कुंकू
अक्षता
विड्याचे पान
सुपारी
श्रीफळ
लवंग
वेलची
धूप
कापूर
अरगबत्ती
दीपक
कापूस
धागा
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, सारख)
गंगाजल
गुळ
धने
पाच फळं
फुलं
जव
गहू
दुर्वा
चंदर 
शेंदूर
सुकामेवा
लाह्या
बत्तासे
यज्ञोपवीत
वस्त्र
अत्तर
चौरंग
कलश
कमल पुष्प माला
शंख
आसन
पूजाथाळी
चांदीची नाणी
आंब्याची डहाळी
नैवेद्य

दिवाळी लक्ष्मीपूजन पद्धत

देवी लक्ष्मींची स्थापना 

सर्वप्रथम आसनावर लाल कपडा परिधान करा. त्यानंतर मूठभर तांदूळ ठेवा त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करा. 

कलशाची स्थापना

आता एका बाजूला तांदूळ घाला त्यावर कलश स्थापन करा. कलश हे तांबं, पितळं किंवा चांदीचा असू शकतो. 3/4 भांडे पाण्याने भरा आणि त्यात झेंडूची फुलं आणि तांदळाचं काही दाण्यासोबत एक नाणं, 1 अख्खी सुपारी टाका. कलशाच्या तोंडावर आंब्याची किंवा विड्याची पाच पानं ठेवा. 

लक्ष्मी-गणेशाची मूर्ती 

लक्ष्मीजींची पूजा करताना लक्ष्मी-गणेशजींची मूर्ती किंवा चित्र पूजेच्या मध्यभागी स्थापन करा. लक्षात ठेवा की मूर्ती कलशाच्या नैऋत्य दिशेला असावं. यानंतर आरतीचं छोटं ताट देवी लक्ष्मीसमोर ठेवा, तांदळावर हळद लावून कमळाचं फूल नक्की ठेवा. तुम्ही नाणी, नोटा, सोन्याची नाणी, दागिनं इत्यादीच्या गोष्टी ठेवा. 

लक्ष्मीपूजा मंत्र आणि इंद्रपूजा मंत्र 

लक्ष्मीपूजा मंत्र – नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।। धनदायै नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदः ।।

इंद्रपूजा मंत्र – ऐरावत समारूढो वज्रहस्तोमहाबलः । शतयज्ञाभिधो देवस्तस्मादिन्द्राय ते नमः ।।

‘हे’ नैवेद्य दाखवा

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मखाणा, बत्तासे, हलवा, खीर, डाळिंब आणि सुपारी अर्पण नक्की करा. श्रीगणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई अवश्य अर्पण करा. 

व्हिडीओद्वारे पाहा लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण पूजा विधी आणि मांडणी 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts