Government Blocks 120 Youtube Channels Marathi News;केंद्र सरकारचा ‘डिजिटल स्ट्राइक’, 120 हून अधिक यूट्यूब चॅनल ब्लॉक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवरुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची आता काही खैर नाही. केंद्र सरकारने फेक न्यूज संदर्भात कडक पावले उचलली आहेत. सध्याच्या काळात युट्यूब हे कमाईचे मोठे साधन झाले आहे. युट्यूब व्हिडीओची कमाई क्लिक्सवर आधारित असते. अनेक युट्यूबर्स याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या जातात. यातून खळबळ निर्माण करुन व्ह्यूज वाढवण्याचा हेतू असतो. त्यामुळे फेक न्यूजमधून होणारी बेकायदेशीर कमाई ही गंभीर चिंतेची बाब बनत चालली आहे. भारत सरकारने याविरोधात पुन्हा एकदा मोठा स्ट्राइक सुरू केला आहे.

यूट्यूबवरील फेक न्यूजमुळे सरकार चिंतेत 

खोट्या बातम्यांमधून पैसे कमावणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे.  केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या एका वर्षात म्हणजे डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत, पीआयबीने अशा 26 युट्यूबर्सवर कारवाई केली. नियमितपणे चुकीची माहिती आणि बातम्या प्रकाशित करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. 

120 यूट्यूब चॅनेल ब्लॉक

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 20 अंतर्गत u 120 हून अधिक YouTube चॅनेल अवरोधित केले आहेत.

निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतातील राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोरममध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालही आता अवघ्या 48 तासांमध्ये म्हणजेच 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. त्यामुळं या घडामोडींना आणखी वेग आला आहे. या निकालांपूर्वी डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं आता या वाढलेल्या दराचा आर्थिक भार अनेकांनाच सोसावा लागणार आहे. 

प्राथमिक माहितीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढले असून आता ही किंमत 2000 रुपयांच्या फार जवळ पोहोचणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यानंतर घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात आतापर्यंत कोणताही बदल झाला नसल्यामुळं हे दर स्थित आहेत ही दिलासादायक बाब. 

Related posts