( प्रगत भारत । pragatbharat.com)
Wedding Viral Video : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण… लग्नात (Wedding) प्रत्येकजण काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कोणी विमानातून एन्ट्री मारतं. तर कोणी विमानातच लग्न करतं. कोणाला पारंपारिक लग्न करायचंय तर कोणाला डेस्टिनेशन वेडिंग. लग्न प्रत्येकासाठी खास असतं. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Wedding Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांच्या हसावं की रडावं, हेच कळत नाहीये. असं नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये पाहुया…
भारतीय विवाह सोहळ्यामध्ये सर्वात जास्त चर्चा असते ती जेवणाची. जेवण चांगलं झालं तर लग्न लय भारी होतं, बरं का! अशी चर्चा होते. मात्र, कोणाला जेवण आवडलं नाही तर लग्न चांगलं झालं नाही, असा समज असतो. त्यामुळे गावाकडच्या लग्नात लाडू आणि जिलेबीची जागा आता मट्टा आणि बासुंदीने घेतलीये. तर अनेक वेगवेगळे प्रकार लग्नात पहायला मिळतात. अशातच सध्या सोशल मीडियावर हायफाय वऱ्हाड्यांचा (Wedding Guests) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एका लग्नसोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये पाहुण्यांना तव्यावर रोट्या बनवताना दाखवण्यात आलंय. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात पाहुणे काउंटरजवळ उभं राहून रोट्या बनवताना दिसत आहेत. एका हातात जेवणाची ताट अन् दुसऱ्या हाताने रोटी भाजताना पाहुण्याची चांगलीच कसरत होताना दिसतीये. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची देखील तारंबळ उडाल्याचं दिसतंय.
पाहा Video
New thing in the parties, make roti yourself..
Kal bolenge party ke bartan bhi dhoke jaao
— Lost in Paradise (@Lost_human19) December 1, 2023
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनेकांनी भन्नाच कमेंट केल्या आहेत. चपाती कच्ची राहिली तर आचारी जबाबदार नसेल, असं म्हणत एकाने हास्यकल्लोळ उडवून दिलाय. तसेच अनेक भन्नाट कमेंट देखील वाचायला मिळत आहेत. सध्या या व्हिडीओला 4 लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले असून 5 हजार जणांनी या व्हिडीओला लाईक केलंय. मात्र, हा अजब प्रकार पाहून अनेकांनी डोळे उघडेच्या उघडे राहिल्याचं दिसून येतंय.