दुपारच्या डब्यानंतर ‘या’ शाळेत बेंचचा होतो बेड, शिक्षिका टाकतात पांधरुण अन्..; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Children Sleeping In School Class: शाळा असो, कॉलेज असो किंवा अगदी ऑफिस असो दुपारच्या जेवणानंतर जोरदार जांभई देणं किंवा अगदी डुलक्या लागणं यासारख्या गोष्टी सर्वांबरोबरच घडतात. शाळेत तर फार कष्टाने दुपारच्या जेवणानंतर जागं राहण्याचं दिव्य करावं लागत असल्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आला असेल. शाळेत वर्ग सुरु असताना झोप लागली आणि शिक्षकाने अशा एखाद्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पडलं तर शिक्षा ठरलेली असते. हल्लीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून पुस्तकी अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हीटी करुन घेतल्या जातात. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर डुलकी लागणं ही तर फारच सामान्य बाब आहे. 

शाळेने शोधला रामबाण उपाय

झोप पूर्ण न झाल्यास मानसिक ताण येतो. अशा वेळेस मुलांना शाळेत झोप येणं ही फार सामान्य बाब आहे. झोप पूर्ण न झाल्यास आणि आळसामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. याच गोष्टी लक्षात घेत चीनमधील काही शाळांनी यावर एक रामबाण उपाय शोधला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुपारचं जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वामकुक्षी घेण्यासाठी बसल्या जागीच एक खास सोय करुन देण्यात आली आहे. हे विद्यार्थी जेवणानंतर काही वेळ वर्गातच अगदी घरी झोपल्याप्रमाणे निवांत झोपू शकतात.

व्हिडीओमध्ये काय?

चीनमधील एका शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही शाळा विद्यार्थ्यांना दुपारी डबा खाल्ल्यानंतर झोपायची परवानगी देते. यासाठी शाळेकडून चादर आणि उशीही पुरवली जाते. व्हायरल व्हिडीओमध्ये मुलं बसल्या जागीच आपल्या बेंचचा मिनी बेड करुन त्यावर निवांत झोपल्याचं दिसत आहे. मुलं झोपलेली असताना त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक शिक्षिका वर्गात उपस्थित असते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी या हटके भूमिकेचं समर्थन केलं आहे. 

झोपा काढण्यासाठी दिला जातो वेळ

सोशल मीडियावरील व्हायरल एक्स फन नावाच्या एक्स अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “चीनमधील काही शाळांमध्ये डेस्कलाच बेडमध्ये कन्वहर्ट करण्याची सोय आहे. या विद्यार्थ्यांना नॅप टाइम म्हणजेच झोप काढण्यासाठीही वेळ दिला जातो. हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहे,” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. 

ऑफिसमध्येही हवं हे

हा केवळ 39 सेकंदांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.  व्हिडीओला 1 हजाराहून अधिक लाईक्स आहेत. लाखोंच्या संख्येनं या व्हिडीओ व्ह्यूज आहेत. काहींनी ही सेवा ऑफिसमध्येही दिली पाहिजे असं म्हटलं आहे. 

Related posts