करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. यानंतर घटनास्थळावरुन ते फरार झाले आहेत. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. गोळीबार झाला तेव्हा सुखदेव सिंह गोगामेडी आपल्या घऱात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारचे लोक धावत घटनास्थळी दाखल झाले होते. सुखदेव सिंह गोगामेडी यांना तात्काळ मेट्रोजवळ असणाऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोळीबार झाला तेव्हा सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यासोबत असणारे अजित सिंह गंभीर  जखमी झाले आहेत.  
पोलिसांनी सांगितलं आहे की, सुखदेव सिंह गोगामेडी मंगळवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास श्यामनगर जनपथ येथील घऱाबाहेर उभे होते. याचवेळी स्कूटरवरुन 2 हल्लेखोर आले. यानंतर त्यांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळीबार सुरु केला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
 

Related posts