( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bihar News: बिहारच्या नवादा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला शिपायाच्या एकुलत्या एक मुलाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. राहुल कुमार असे मृत तरुणाचे नाव असून त्याची आई कॉंन्स्टेबल आहे. केएलएस कॉलेजचा विद्यार्थी असलेला राहुल घरी पायी जात होता. तो रस्त्याच्याकडेला झाडाजवळ पोहोचला तेव्हा हल्लेखोर मागून आला. त्याने पिशवीतून मिर्ची पावडर काढून राहुच्या डोळ्यात टाकली. यानंतर त्याच्या पोट आमि इतर भागामध्ये 25 ते 30 वेळा चाकूचे वार केले. हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये राहुलची हत्या स्पष्टपणे दिसत आहे. एसपी अजय प्रसाद हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आजुबाजूला चौकशी केली. यावेळी आरोपी हा 35 ते 40 वर्षांचा असल्याचे सांगितले गेले. पण आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. आम्हाला एका तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली आणि आम्ही लगेच घटनास्थळी दाखल झालो.
बिहार के नवादा में दिनदहाड़े हुई महिला सिपाही के बेटे की निर्मम हत्या
अपराधी ने 30 बार युवक को चाकू से गोदा
पूरी घटना सीसीटीवी में कैद pic.twitter.com/oxcfuIairW
— Privesh Pandey (@priveshpandey) December 9, 2023
ही घटना घडली तेव्हा केएलएस कॉलेजमध्ये बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरु होती. परीक्षा केंद्राच्याबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी होती. असे असतनाही आरोपीने राहुलच्या शरीरात चाकू खुपसणे सुरुच ठेवले. आजुबाजूला लोक उभे होते पण कोणीच त्याच्या मदतीला धावले नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर राहुलला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
भारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना एक एक करुन संपवलं जात आहे. अज्ञात बंदूकधारी पाकिस्तानपासून कॅनडापर्यंत भारताच्या शत्रूंना मारत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अज्ञात हल्लेखोरांविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हल्लेखोरांचे लक्ष्य हे भारत सरकारला हवे असलेल्या दहशतवादी आहेत. पण आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच या हत्यांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक भारतीय अधिकाऱ्यांना हवे आहेत त्यांनी येथे येऊन कायद्याला सामोरे जावे, असे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केलं आहे. भारत सरकारची या विषयावर कोणतीही भूमिका नाही. गुन्हेगारांना भारतीय कायदेशीर व्यवस्थेला सामोरे जावे, अशी भारताची अनेक दिवसांपासून मागणी आहे, असे अरिंदम बागची म्हणाले. “ज्यांना भारतात गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांसाठी न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांनी भारतात येऊन आमच्या कायदेशीर व्यवस्थेला सामोरे जावे अशी आमची इच्छा आहे. ते करा पण मी पाकिस्तानात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करू शकत नाही,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.