( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bride Runs Away From Wedding: लेकीचं लग्न होतं, मांडव पडला होता, वऱ्हाडी लग्नस्थळी पोहोचले होते, घरात नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. नवरादेखील वरात घेऊन निघाला होता. वरात पोहोचण्याआधीच नवरीच घरातून फरार झाली. लग्नाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला असतानाच नवरी गायब झाल्याने एकच गोंधळ माजला. नवरीच्या नातेवाईकांनी गावात शोधा-शोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर हतबल ठरलेल्या बापाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावातीलच प्राथमिक शाळेत ती लपून बसल्याचं समोर आलं. लग्नातून पळून जाण्याचे कारण तिने सांगताच तिथे उपस्थितांचेही डोळे पाणावले.
लग्नघरातून नववधू बेपत्ता
उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील ही घटना आहे. गावातील मुलीचं मिर्झापूरमधील मुलासोबत ठरलं होतं. दुपारी लग्नाचे सुरुवातीचे विधी आटोपल्यानंतर नववधू मांडवातून फरार झाली. नववधू घरात कुठेच दिसत नाही हे लक्षात येताच एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर तिला शोधण्यासाठी एकच गडबड सुरु झली. घराच्या परिसरात तिचा शोध घेतला तरीही ती कुठेच सापडली नाही. धास्तावलेल्या वडिलांनी अखेर पोलिसांत धाव घेत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
दुसऱ्याच मुलीसोबत लावलं लग्न
लग्न मांडवातून वधू पळून गेली असली तरी विवाह नियोजित वेळेतच पार पडला. नवरदेवाच्या सहमतीने दुसऱ्या मुलीसोबत मुलाचे लग्न करण्यात आले.
गावातील शाळेत सापडली तरुणी
मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार त्यांनी गावातीलच प्राथमिक शाळेत तिचा शोध घेतला. त्यावेळी शाळेतच ती सापडली. पोलिसांनी व नातेवाईकांनी तिला लग्न मांडवातून पळून जाण्याचे कारण विचारले. तिने कारण सांगताच तिथे उपस्थितांचेही डोळे पाणवतील.
पळून जाण्याचे कारण सांगितले
मुलीने सांगितले की, पळून जाण्यासाठी तिच्यावर कोणाचाही दबाव नव्हता. मी माझ्या मर्जीने घरातून पळून गेले. मला आयएएस व्हायचं आहे, पण खरच्यांनी माझं जबरदस्ती लग्न ठरवलं म्हणून मी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मला यूपीएससीची तयारी करायची आहे, असं या मुलीने सांगितले आहे.
पोलिसांनी मुलीला तिच्या घरी सोडले आहे. तसंच, या प्रकरणाचा अन्य दृष्टीनेही तपास होत आहे, असं पोलिस अधिकारी राम सरीख गौतम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुलीला पुढे शिकायचं असल्याने तिने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर तिच्या कुटुंबीयांनी काय प्रतिक्रिया दिली किंवा काय निर्णय घेतला हे मात्र अद्याप कळू शकले नाहीये.