Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी ‘जडत्व योग’! ‘या’ राशींना आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jadatva Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ग्रहांचं गोचर अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करणार आहे. त्याचा परिणाम काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. नवीन वर्षात एक अतिशय दुर्मिळ आणि धोकादायक योग निर्माण होणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी ग्रह राहू यांचं नवीन वर्षात अतिशय धोकादायक योग निर्माण होतो आहे. ‘जडत्व योग’ नावाचा अशुभ योग अनेक राशींच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा दाता बुध हा मीन राशीत 7 मार्चला सकाळी 9.40 वाजता गोचर करणार आहे. जिथे राहु ग्रह आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे जडत्व योगाची निर्मिती होणार आहे. (Jadatva Yog from the combination of Mercury and Rahu in 2024 Financial loss to these zodiac sign Rahu budh yuti 2024)

मेष रास (Aries Zodiac) 

या राशीमध्ये बाराव्या घरात जडत्व योग तयार निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चढ-उतार पाहिला मिळणार आहे. एकाग्रतेच्या अभावामुळे तुम्हाला काही समस्यांना त्रासदायक ठरणार आहे. तुम्ही गोष्टी हाताळण्याचा खूप प्रयत्न कराल, पण त्या तुम्ही अपयशी ठरणार आहात. आरोग्याबाबत थोडं सावध राहवं लागणार आहे. तुम्हाला निद्रानाश आणि मानसिक तणावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मित्रांसोबत काही मुद्द्यावरून वाद होण्याची भीती आहे. आर्थिक नुकसानही होणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  

या राशीमध्ये पाचव्या भावात जडत्व योग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे. अभ्यासात काही तणावाची परिस्थिती निर्माण होणार आहे. काही कारणांमुळे तुम्हाला अधिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. अशा परिस्थितीत एखाद्याला जीवनात अनेक वादळ येणार आहे. आर्थिक गणितीही गडबडणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac) 

या राशीमध्ये चढत्या घरात जडत्व योग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणं गरजेचे आहे. कोणतेही काम पूर्ण विचार करु करा अन्यथा तुम्हाला महागात पडेल. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असणार आहात. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नोकरदार लोकांनीही थोडे सावध राहावं लागणार आहे. कारण एखादा प्रतिस्पर्धी किंवा गुप्त शत्रू तुमच्याविरोधात कटकारस्थान रचणार आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय या काळात टाळा. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts