‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jaya bachchan : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधकांनी जिथं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली, तिथंच इतरही काही मुद्द्यांवर प्रचंड चर्चा झाली. यातलाच एक मुद्दा होता, शौचालयासंदर्भातला. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेत शौचालयांचा मुद्दा उपस्थित करत परिस्थिती नेमकी किती विदारक आहे हीच बाब प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या साऱ्यात मागील दोन दिवसांमध्ये 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदार निलंबित)

संसदेतील या घडामोडींमध्येच खासदार (MP Jaya Bachchan) जया बच्चन यांनीसुद्धा सर्वांच्याच नजरा वळवल्या. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी कठोर शब्दांत काही गोष्टी मांडत विरोधी पक्षांना मिळणाऱ्या वागणुकीबबात सत्ताधारी आणि सभापतीच्या कामावर नाराजी व्यक्त केली. 

‘सकाळपासून आमची सुनावणी झाली नाहिये. सभापती म्हणतायत आमची सहनशक्ती पाहणा, काल यांनी आमच्या सहकाऱ्यांना निलंबति केलं आणि आज वेलमध्ये आलेल्या कोणावरही कारवाई केली नाही. दर अर्ध्या तासाला ही मंडळी पाणी प्यायला, बाथरुमला निधून जातात. इथं आमच्या, महिलांच्या शौचालयांची किती वाईट अवस्था आहे मी काय सांगू, हे सर्वच चुकीचं आहे’, असं म्हणत त्यांनी एका मूळ मुद्द्यावरच कटाक्ष टाकला. 

विधेयक मान्यच करून घ्यायचं होतं तर ते सहज करून घेता आलं असतं. त्यासाठी इथवर येऊ ते नकारण्याची आणि इतकी नाटकी चाल चालण्याची गरज नव्हती अशा आशयात बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली. 

 

दरम्यान, संसदेत खासदारांच्या निलंबन कारवाईचा वाद सध्या चांगलाच पेटला आहे. निलंबित करण्यात आलेल्या या खासदारांमध्ये 95 खासदार लोकसभेतील असून, 46 खासदार राज्यसभेतील असल्याची आकडेवारी समोर आली आहे. इथं विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन होत असतानाच सत्ताधारी पक्षाला संसदेत एकतर्फी वातावरणच हवंय असा आरोपाचा सूर अनेक विरोधी पक्ष आळवताना दिसत आहेत. 

ही कृती लोकशाहीची गळचेपी असल्याचं म्हणत विरोध सातत्तानं नाराजीची भूमिका आता उघडपणे मांडताना दिसत आहेत. इथं विरोधी पक्षातील खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळं आता लोकसभेत इंडिया आघाडीची ताकद कमी झाली असून, जवळपास एक तृतीयांश संख्याबळ कमी झालं आहे. 

Related posts