अचानक छातीत दुखु लागले अन् ती जागीच कोसळली; 17 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indore Heart Attack Case: तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकाराच्या झटक्यामुळं तरुणांनी जीव गमावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे, एका 17 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने तरुणीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

इंदूरच्या मल्हारगंज परिसरात रामबल्ली नगरमध्ये महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणाऱ्या संजना यादव (17) या तरुणीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. घटनेच्या आधी संजनाची प्रकृती अगदी स्वस्थ होती. तिला कोणताही आजार नव्हता.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना मंगळवारी संध्याकाळ ते रात्रीपर्यंत एकदम ठणठणीत होती. तिने घरी येऊन आभ्यासदेखील केला होता. 

मध्यरात्री छातीत दुखू लागले

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, संजनाने रात्री सर्वांसाठी जेवणदेखील बनवले होते. जेवण झाल्यानंतर ती झोपायलादेखील गेली होती. मात्र, अचानक मध्यरात्री ती झोपेतून उठली. तिला अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखायला लागले. तिला खूप घाबरल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर लगेचच तिच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत संजनाचा मृत्यू झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, संजनाचा मृत्यू हार्टअॅटेकने झाला असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नक्की कारण समोर येणार आहे. संजनाचे आई-वडिल मजुरी करतात तर तिला एक भाऊदेखील आहे. 

डॉक्टर काय म्हणाले?

हृदयरोग विशेतज्ज्ञ डॉ. ए. डी भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसीर, संजनाला आधीपासूनच हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल किंवा कोरोनरी आर्टिरीजसारखे काही आजार होते हे पाहणे गरजेचे आहे. जर, मुलीला आधीपासूनच असे आजार असतील तर थंडीच्या दिवसांत त्याची तीव्रता अधिक वाढते, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, त्यांनी पुढे म्हटलं आहे की, तरुणांमध्ये व अल्पवयीन मुलांमध्ये हार्ट अटॅकचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. सामान्यतः हार्ट अॅटकची समस्या लहान मुलांमध्ये सुरुवातीपासूनच नसते. ज्यामुळं इतक्या लहान वयात  हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य कारण हे अनुवंशिकता किंवा कार्डियोमायोपॅथी असू शकते, असं हदयरोगविशेषज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

Related posts