( प्रगत भारत । pragatbharat.com)
Woman Finds Hidden Mysterious Door: महिलेने मागच्याच वर्षी नवीन घर घेतले. एक वर्ष ती त्या घरात आनंदाने राहत होती. घराला एक वर्ष झाल्यानंतर तिने घर रिनोव्हेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने तयारीही सुरू केली. मात्र, अनेकदा जुन्या घरांमध्ये चोर दरवाजे किंवा गुप्त रस्ते असतात ते आपल्याला ठावूक नसतात. नकळत आपल्याकडून अशा गोष्टी उघडल्या जातात आणि मग नको ते होऊन बसते. असंच या महिलेच्या बाबतीत झालं आहे. या महिलेला घरात गुप्त दरवाजा सापडला. दरवाजा उघडताच आतमधील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमिनच हादरली आहे.
बर्मिंगहम मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या महिलेने घराचे रिनोव्हेशन करण्यास सुरुवात केली. घरातील भिंतीवर असलेला जुना वॉलपेपर काढून ती नवीन लावणार होती. जुना वॉलपेपर काढत असताना तिला एक रहस्यमयी दरवाजा दिसला. या दरवाजाला हँडलदेखील नव्हते. घरात गुप्त दरवाजा पाहून ती आश्चर्यचकित झाली. दरवाजाबद्दल विचार करत असतानाच तो अचानक उघडला गेला.
सुरुवातीला महिलेला वाटले की आतमध्ये स्टोअर रुम असेल व तिथे खूप कोळ्यांचे जाळे पसरलेले असेल. मात्र, प्रत्यक्षात तिथे काहीतरी वेगळेच होते. ते पाहून तिच्या पायाखालची जमिनच हादरली होती. मात्र आत जी वस्तू पाहताच तिला चक्कर येणच बाकी राहिलं होतं. महिलेने सोशल मीडियावर तिचा हा अनुभव शेअर केला आहे.
महिलेने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहलं आहे की, मी खोटं बोलत नाहीये, मी पुरावेदेखील देऊ शकते. मी तो गुप्त दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये एका कोपऱ्यात एक मानवी सांगाडा होता. तो सांगाडा पाहून मी दोन क्षण एकाच जागी उभे होते. भीतीने माझी बोलतीच बंद झाली होती, असं तिने सोशल मीडियावर म्हटलं आहे.
महिलेने लगेचच घर मालकाला फोन केला व त्या दरवाजाबद्दल क मानवी सांगाड्याबद्दल सांगितले. मात्र, त्याने जे सांगितले ते ऐकून तिला संतापच अनावर झाला आहे. तिच्या आधीच्या घर मालकानेच तो सांगाडा तिथे ठेवला होता. मात्र तो सांगाडा खोटा आहे. आधीच्या घर मालकाने स्पष्टीकरण दिल्यानंतर तिची भिती थोडी कमी झाली.
सोशल मीडियावर या महिलेने ही पोस्ट टाकताच यावर अनेव विविध कमेंट आल्या आहेत. काही लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. तर काही जणांनी घाबरट म्हणत तिची खिल्ली उडवली आहे.