मसाजच्या नावाखाली लहान मुलींचं लैंगिक शोषण; सेक्स स्कँडलमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांचंही नाव आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jeffrey Epstein News : जागतिक स्तरावर लक्ष वेधणाऱ्या घटनांमध्ये सध्या एक नाव सातत्यानं पुढे येत असून, त्याभोवती असणारं वादाचं वलय अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. अमेरिकेतील न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमुळं सध्या देशभरात एकच खळबळ माजली असून, Jeffrey Epstein Scam म्हणून या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. जेफ्री एफस्टीन प्रकरणी सादर करण्यात आलेल्या या पुराव्यांमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावं असून, यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांचाही समावेश आहे.

कोण आहे जेफ्री एपस्टीन? 

जेफ्री एपस्टीन हा तोच इसम आहे ज्याच्यावर कैक महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. 2002 ते 2005 दरम्यान, फ्लोरिडामध्ये तो त्याच्या निवासस्थानी बोलवून त्यांच्याशी संबंध ठेवून यासाठी तो त्या महिलांना आर्थिक मोबदला देत होता. असं म्हणतात की, जेफ्रीचं 72 एकरांच्या भूखंडावर एक खासगी बेट होतं. जिथं अनेक व्हिला होते. कैक नागरिक या व्हिलांच्या दिशेनं जात होते. 2019 मध्ये कारावासात असतानाच त्यानं आत्महत्या करून आयुष्य संपवलं होतं. 

न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात देण्यात आलेल्या आदेशानंतर एपस्टीनशी संबंधित प्रकरणांची 900 हून अधिक कागदपत्र जाहीरपणे सर्वांसमोर आणण्यात आली. सीएनएनच्या वृत्तानुसार न्यायालयाच्या आदेशांनंतर आतापर्यंत हे पहिल्या टप्प्यातील पुरावे सादर करण्यात आले आहेत. येत्या काळात याबाबतच्या पुराव्यांमध्ये आणखी 200 नावं समोर येण्याची शक्यता असून, या नावांमध्ये मोठ्या उद्योजकांसह बड्या नेतेमंडळींचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

जेफ्री एपस्टीन प्रकरणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पुराव्यांमध्ये अनेक तरुणींचे जबाब आहेत. ज्यामध्ये एका महिलेनं केलेल्या गौप्यस्फोटानुसार 2001 मध्ये एपस्टीनच्या मॅनहॅटनमधील एका अपार्टमेंटमध्ये सोफ्यावर बसलेल्या प्रिन्स अँड्र्यूनं तिच्याशी गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

जेफ्रीच्या मॅक्सवेल नामक सहकाऱ्याच्या जबाबानुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी एपस्टीनच्या प्रायव्हेट जेटनं अनेकदा प्रवास केला होता. किंबहुना त्यांना तरुण मुली फार आवडतात असं एपस्टीननंच (कथित गर्लफ्रेंड) मॅक्सवेलला सांगितलं होतं. एपस्टीन प्रकरणी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये लिओनार्दो डीकेप्रिओ, नाओमी कँम्पबेल, कॅमरन डिआज, मायकल जॅक्सन यांची नावं असली तरीही त्यांच्यावर कोणतेही गंभीर आरोप नाहीत. 

सदर प्रकरणात एक अमेरिकन महिलेनं केलेल्या गंभीर दाव्यानं अनेकांच्याच नजरा वळवल्या. कारण, आपल्या बालपणी जेफ्रीनं लैंगिक शोषण केल्याचा दावा तिनं केला होता. मॅक्सवेल आणि जेफ्री मुलींचा शोध घेऊन त्याच्या घरी मसाज आणि इतर कामांच्या बहाण्यानं नेत असत. जवळपास 30 ते 33 मुलींना त्यानं घरी नेल्याची माहिती तिनं दिली होती. त्यांनी मसाज घ्यायला जातो असं म्हटलं की ‘काम इच्छा’पूर्ण करायला जातो असा त्याचा अर्थ गृहित धरला जात असे.  सध्या या प्रकरणामुळं अमेरिकेत एकच खळबळ माजली असून, त्याप्रकरणी पुढील तपासातून कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Related posts