BREAKING! फ्रान्समध्ये चाकू हल्ला, हल्लेखोराने 8 लहान मुलांना भोसकलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Knife Attack in France: फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. सीरियामधील नागरिकाने लहान मुलांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार लहान मुलं जखमी झाली असून एका नागरिकाचाही समावेश आहे. पार्कात हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फ्रेंच आल्प्सजवळ (French Alps) वसलेल्या अॅनेसी (Annecy) शहरात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सीरियामधील नागरिकाने हा हल्ला केला असून कायदेशीर निर्वासित होण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांनी या हल्ल्यानंतर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे अत्यंत भ्याडपणाचे कृत्य असल्याचं राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. “लहान मुलं आणि एक सजग नागरिक जीवन आणि मृत्यूशी लढत आहेत. या हल्ल्याने देशाला धक्का बसला आहे,” असं इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले आहेत. 

फ्रान्सचे संरक्षण मंत्री गेराल्ड डारमॅनिन (Gerald Darmanin) यांनी ट्वीट करत हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेली दोन मुलं आणि एक पुरुष गंभीर स्थितीत आहे. दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. 

साक्षीदारांनी सांगितले की किमान एक मूल स्ट्रोलरमध्ये होते. BFM टीव्हीने पोलीस कशाप्रकारे हल्लेखोराला पकडलं याचा व्हिडीओ दाखवला आहे. फ्रान्सचे राष्ट्रीय सभागृहाचे स्पीकर याएल ब्रॉन-पिवेट यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, “लहान मुलांवर हल्ला करण्यापेक्षा दुसरे काहीही घृणास्पद नाही”. हल्ल्याचा निषेध म्हणून फ्रेंच संसदेने एक मिनिट मौन पाळलं.

Related posts