( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Barbeque Nation Dead Mouse in Food: मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही.
75 तास हॉस्पीटलमध्ये
या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या व्यक्तीचं नाव राजीव शुक्ला असं आहे. राजीव 8 जानेवारी 2004 रोजी प्रयागराजवरुन मुंबईत आला होता. त्याने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं. या खाण्यामध्ये मेलेला उंदीर आढळून आला. विषबाधा आणि प्रकृतीसंदर्भातील तक्रारी जाणवू लागल्याने राजीवला पुढील 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीवने नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी लेखी तक्रार स्वीकारली असली तरी एफआयआर दाखल केलेली नाही.
सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
पीडित राजीवने पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्यासंदर्भात सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे. त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 8 जानेवारी रोजी मी प्रयागराजवरुन मुंबईला आहे. मी बार्बेक्यू नेशनमधून शाकाहारी जेवण मागवलं होतं. त्यामध्ये एक मेलेला उंदीर सापडला. मला त्यानंतर 75 तास हॉस्पीटलमध्ये रहावं लागलं. मी पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली मात्र आतापर्यंत नागपाडा पोलिसांनी माझी एफआयआर दाखल करुन घेतलेली नाही, असं राजीवने म्हटलं आहे. या पदार्थाच्या फोटोंसहीत राजीवने पोस्ट केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
I Rajeev shukla (pure vegetarian) from prayagraj visited Mumbai, on 8th Jan’24 night ordered veg meal box from BARBEQUE NATION, worli outlet that a contained dead mouse, hospitalised for 75 plus hours. complaint has not been lodged at nagpada police station yet.
Please help pic.twitter.com/7iaZmkkfRf— rajeev shukla (@shukraj) January 14, 2024
हॉटेलचं म्हणणं काय?
या घटनेनंतर बार्केक्यू नेशनने एक पत्रक जारी करुन आपली बाजून मांडली आहे. राजीव शुक्ला नावाच्या व्यक्तीची तक्रार आम्हाला मिळाली. त्यांनी 8 जानेवारी 2024 रोजी आमच्या एका आऊटलेटमधून जेवण ऑर्डर केली होती. त्यामध्ये त्यांना मेलेले किडे आढळून आले. आम्ही या प्रकरणामध्ये आम्ही अंतर्गत चौकशी केली मात्र त्यात कोणताही दोष दिसून आला नाही. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेतली मात्र त्यात असं कोणीही माहिती समोर आलेली नाही. आम्ही यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत, असं पत्रकात म्हटलं आहे.
बार्बेक्यू नेशन ही प्रसिद्ध फ्रेंचायजी असून मुंबईसहीतच उपनगरांमध्ये आणि देशभरात त्यांचे बरेच आऊटलेट्स आहेत. अशा नामांकित कंपनीकडून अशाप्रकारची गंभीर आणि अगदी ग्राहकाच्या जीवाला धोका निर्माण करणारी चूक झाल्याने खवय्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.