lord shree ram idol in ayodhya enthusiasm of Rama devotees

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली. काल ही मूर्ती अयोध्येत (Ayodhya) दाखल झाली. अयोध्यावासीयांनी मोठ्या उत्साहात, रामनामाच्या गजरात प्रभूरामचंद्राचं स्वागत केलं. एका मोठ्या ट्रकमधून राममूर्ती मंदिराच्या प्रांगणात वाजत गाजत दाखल झाली. ही मूर्ती आज गर्भगृहात स्थापन करण्यात येईल.. याच मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात झालीये.. दरम्यान प्रभू श्रीरामाची (Lord ShreeRam) मूर्ती घेऊन ज्यावेळी ट्रक निघाला त्यावेळी नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. प्रभू श्रीरामाच्या जयघोषानं अवधपुरी दुमदुमुन गेली. मूर्ती ज्या मार्गावरुन नेली जात होती, त्या मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

आता 22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येईल. या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित असतील. श्रीरामाची प्रतिमा मंदिरात दाखल झाल्यानंतर  राम भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतोय. रामाच्या गाण्यावर नाचत-गात भक्त अयोध्येत दाखल होतायत. यावेळी भक्तांनी 201 किलो लाडूही रामासाठी आणलेत. अयोध्येतील वातावरण राममय झालंय. मोठ्या प्रमाणावर 22 जानेवारीच्या सोहळ्याची तयारी करण्यात येतेय. रामायण कालीन प्रसंग मुर्तींच्या सहाय्याने या ठिकाणी उभे करण्यात आलेत. बाल अवस्थेतील प्रभू श्रीराम ते वनवास आणि विविध प्रसंग उत्तमरित्या इथे साकारण्यात आलेत.

अयोध्या परिसरात राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलीय. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मंदिर सर्वांना पाहता यावं यासाठी ही प्रतिकृती उभारण्यात आलीय. या मंदिरासोबत सेल्फी काढण्यासाठी भाविक गर्दी करतायत. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जसजसा जवळ येतोय. तस तसं तिथलं वातावरण आणखी राममय होत चाललंय. अयोध्येमध्ये भजन- किर्तन आणि गाण्यांनी वातावरण मंत्रमुग्ध झालंय. अयोध्या नगरीचं वर्णन करणारी गीतं आणि प्रभू श्रीरामांबाबतची भजन-किर्तनं सादर करण्यात येताय.

पीएम मोदींच्या हस्ते पोस्टाच्या तिकिटाचं प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिरावर आधारीत पोस्टाच्या तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं.. या टपाल तिकीटावर प्रभू श्रीरामाचंही छायाचित्र आहे.. या तिकीटांसह प्रभू रामावर जगभरात जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचंही प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. 22 जानेवारीच्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये 510 विशेष अतिथी उपस्थित असणार आहेत. 510 पाहुण्यांना स्टेट गेस्ट म्हणजेच राज्य अतिथींचा दर्जा देण्यात आलाय. VVIP आणि या 510 पाहुण्यांबरोबर एकेक विशेष समन्वयक अधिकारी उपस्थित असणार आहे. या सोगळ्याला 8 हजार पाहुणे उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.  

 दरम्यान, अगस्त्य हा तरूण  तमिळनाडूतल्या रामसेतूपासून स्केटिंग करत अयोध्येत पोहोचलाय. अगस्त्य गुजरातचा असून तो एमबीए करतोय. रामाप्रती भक्ती व्यक्त करण्यासाठी साडे चार हजार किलोमीटरचा प्रवास स्केटिंगनं करत अयोध्येत पोहोचलाय. 

महाराष्ट्रातही उत्साहाचं वातावरण
अयोध्येत रामलल्लाच्य प्राण प्रतिष्ठेचा मूहुर्त जवळ येतोय. तशी सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचू लागलीये. नाशिकमध्ये एका शिक्षकानं विद्यार्थ्यांसह बोरांतून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारलीये.  भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी विद्यार्थ्यांसह ही प्रतिकृती साकारलीये. रामायणातील शबरीमातेची रामभक्ती सर्वांनाच माहिती आहे. त्यासंकल्पनेतून प्रभू श्रीरामाची ही प्रतीकृती साकारण्यात आलीये. 8 फूट बाय 8 फूट आकारात साकारलेली ही रामाची प्रतीकृती पंचक्रोशीत चर्चाचा विषय ठरलीये. 

22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्य विक्री तसेच मटण, चिकन शॉप बंद ठेवा अशी मागणी संघर्ष सेनेनं केलीय…22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर सोहळा आहे…राम प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम असल्याने त्यादिवशी चिकन शॉप, मद्य विक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात आलीय…यासाठी संघर्ष सेनेनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय…प्रभू राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशात उत्साहचं, आनंदी वातावरण राहावं…देशभरातील सर्व समाज्यातील रामभक्तांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करावा…त्यामुळे मद्यविक्री, मटण शॉप बंद ठेवावी अशी मागणी संघर्ष सेनेनं केलीय…

Related posts