Delhi Crime youth chased shot and his throat slit with a knife in Shastri Park CCTV Footage News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Youth chased shot In Delhi : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील गुन्हेगारीला (Delhi Crime News) उत आल्याचं पहायला मिळतंय. दररोज खून, माऱ्यामाऱ्या तसेच बलात्काराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. अशातच आता दिल्लीतून हादरवणारी माहिती समोर आली आहे. दिल्लीत पुण्यासारखा मुळशी पॅटर्न पहायला मिळतोय. देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीच्या रात्री दिल्लीतील शास्त्री पार्क (Shastri Park) परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नेमकं काय झालं? 

नॉर्थ ईस्ट दिल्लीमधील शास्त्री पार्कमधील बाजारात ही घटना घडली. झालं असं की, नेहमीप्रमाणे व्यापारी आपला व्यवसाय करत होते. तेव्हा बाजारात काहीतरी गोंधळ सुरू असल्याचं लोकांना कळालं. सर्वत्र गोंधळाचा आवाज येऊ लागला. एक मुलगा बाजाराच्या रस्त्यावरून पळत होता. तर त्याच्या मागे काही तरुण पोरं पळत होते. काहींच्या हातात चाकू होता तर काहींच्या हातात चक्क देशी पिस्तुलं होती. तर दोन पोरं गाडीवरून तरुणाचा पाठलाग करत होते.

काही अंतरावर आरोपींनी तरुणाला अडवलं अन् त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. आरोपींनी तरुणाला धु धु धुडतं… एवढंच नाही तर गोळी देखील चालवली. त्यानंतर देखील नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपींचं मन भरलं नाही. त्यांनी तरुणावर चाकूचे वार केले अन् घटनास्थळावरून पळ काढला. 

तरुणावर हल्ला होत असताना आपसापच्या व्यापाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यांनी आपपालं दुकान आटोपून बंद केले. आरोपींनी पळ काढल्यानंतर देखील तरुणासमोर कोणीही जाण्याचं धाडस केलं नाही. काही वेळाने पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीच तरुणाला रुग्णालयात हलवलं. सध्या तरुण जगण्यासाठी झुंज देत आहे.

दरम्यान, नवी दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक आयुक्ताच्या मुलाचं किडनॅपिंग केलं गेलं होतं आणि त्यानंतर 23 जानेवारी रोजी मुलाला कालव्यात ढकलून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लक्ष्य हा दिल्ली पोलिसातील एसीपी यशपाल सिंग यांचा मुलगा होता. लक्ष्य यांचं मित्रासोबत पैशावरून वाद झाल्यानं त्याच्या मित्रानं अपहरन करून हत्या केल्याचे समोर आलंय.

Related posts