Uttarakhand News Lady Singham took out the arrogance of the delhi police constable

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uttarakhand News : वाढत्या उकाड्यामुळे अनेक जण उत्तर भारतातल्या अनेक थंड हवेच्या ठिकाणांना भेट देत आहेत. बरेच जण हे देवभूमि असलेल्या उत्तराखंडलाही (Uttarakhand) पसंती देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तिथल्या प्रशासनावरही ताण पडत आहे. मात्र उत्तराखंड सरकारतर्फे (Uttarakhand Government) येणाऱ्या पर्यटकांना शक्य तितक्या योग्य सुविधा देण्याचे काम केले जात आहे. पण मात्र काही पर्यटक असेही असतात जे स्वतःच्याच विश्वास असल्यासारखे वागत असतात. अशावेळी कर्मचाऱ्यांनाही थोडी फार सक्ती दाखवावी लागते. असाच काहीसा प्रकार उत्तराखंडमध्ये घडलाय.

मोठ्या प्रमाणात पर्यटक उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे गर्दी हाताळणे पोलिसांना कठीण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेकवेळा वातावरण बिघडत असून लोक आता पोलिसांशीही (Uttarakhand Police) हुज्जत घालताना दिसत आहेत. हरिद्वारमध्ये तैनात असलेल्या उत्तराखंडच्या महिला वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने दिल्ली पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलला दंड आकारल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या कारवाईनंतर महिला हवालदाराच्या कृतीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे. कर्तव्यावर असताना नियम न पाळणाऱ्या दिल्ली पोलीस कर्मचाऱ्याला महिला वाहतूक पोलीस हवालदार शर्मिला बिश्त यांनी चांगलाच धडा शिकवला होता. याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

अंगाभोवती पांढरा टॉवेल गुंडाळलेला दिल्ली पोलिसांचा कर्मचारी रस्त्यावरील महिला वाहतूक पोलिसाशी वाद घालत होता. स्वत:ला दिल्ली पोलिसातील कर्मचारी असल्याचे सांगून तो महिला पोलीस कर्मचाऱ्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्याचे म्हणणे न ऐकता त्याचा सगळा उद्दामपणा बाहेर काढला आणि त्याच्या गाडीला दंड ठोठावला.

हरिद्वारला आलेला दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबल अमित यांची पांढऱ्या रंगाची कार क्रमांक DL3CC 6508 प्रेम नगर आश्रम चौकातून ऋषीकुलच्या दिशेने सर्व्हिस लेनवर उभी होती. सुमारे अर्धा तास उत्तराखंड वाहतूक पोलिसांनी सतत घोषणा करूनही गाडी तिथून काढण्यात आली नाही. तेव्हा गाडी टोइंग करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस हवालदार शर्मिला बिश्त यांनी घेतला. त्याचवेळी तिथे हवालदार अमित टॉवेलवरच आला. ही घटना घडली तेव्हा अमित घाटावर आंघोळ करत होता, दंडाच्या कारवाईची माहिती मिळताच तो ताबडतोब टॉवेल गुंडाळून घटनास्थळी पोहोचला. मात्र गाडीला दंड आकारल्याचे कळताच अमित भडकला. महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत त्याने वाद घालायला सुरुवात केली. मी सुद्धा दिल्ली पोलिसांत आहे असे अमित शर्मिला बिश्त यांना सांगत होता.

रागाच्या भरात असलेल्या अमितने स्वतःला दिल्ली पोलिस हवालदार असल्याचे सांगताच शर्मिला बिश्त यांना वाहतुकीचे नियम सांगण्यास सुरुवात केली. तितक्यात बिश्त यांचाही पारा चढला त्यांनीही अमितला वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले. हा सगळा आरडाओरडा पाहून आजूबाजूला गर्दी जमा झाली. त्यावेळी आपण एकच दंड भरणार असल्याचे अमित वारंवार सांगत होता.

चिडलेल्या अमितने स्वतःला दिल्ली पोलीस असल्याचे सांगताच काही वेळातच त्या ठिकाणी जमाव जमला. त्यादरम्यान कोणीतरी या प्रकाराचा व्हिडिओ काढला. पण महिला पोलीस कॉन्स्टेबल शर्मिला बिश्त यांनी खंबीरपणाने अमित सिंग यांना पार्किंगसाठी दंड ठोठावला. त्यानंतर अमितने पैसे देत आपली चूक मान्य केली.

Related posts