White Rice 5 Best Health Benefits; सफेद भात खाण्याचे शरीराला होतात ५ फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

एनर्जी मिळते

एनर्जी मिळते

शरीराला काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते. सफेद तांदळात कार्ब्स मोठ्या प्रमाणात असते. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी कार्ब्सची गरज असते आणि हे तांदळातून मिळते. पण याचा परिणाम शरीरावर थोडा उशीरा होतो.

​पचवणे सहज होते

​पचवणे सहज होते

कधीही पोट खराब होते तेव्हा हलका आहार घेतला जातो. यामध्ये सर्वात अगोदर भाताचा समावेश असतो. तांदूळ खिचडी, पेज या स्वरुपात घेतले जाते. कारण तांदळासारखा हलका पदार्थ नाही. तसेच अनेकदा प्रवासातून घरी आल्यावर खिचडी खाल्ली जाते कारण ती पचणे सोप्पी असते.

​पोषकतत्वाचा साठा​

​पोषकतत्वाचा साठा​

सफेद तांदळात स्टार्चचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मात्र तांदूळ इतर अनेक पौष्टिक गुणांनी समृद्ध असल्याचे हाडवर्डच्या अभ्यासात सांगितले आहे. सफेद तांदळात मॅग्नीज, लोह आणि व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते.

​हाडे-स्नायू होतात मजबूत

​हाडे-स्नायू होतात मजबूत

तांदूळ खाण्यास जरी मनाई असेल तरी यामध्ये अनेक गुण खच्चून भरलेली आहे. सफेद तांदळात आढळणारा मॅग्नेशियम हाडे, नसा आणि स्नायूंना योग्य प्रकारे काम करण्यास मदत करते. या तीनमध्ये काही अडचण आली तर तांदळामुळे ती झिज भरून निघते.

सफेद तांदूळ खाण्याची योग्य पद्धत

सफेद तांदूळ खाण्याची योग्य पद्धत

अनेकदा भात कुकरमध्ये शिजवला जातो. पण या पद्धतीने कधीच सफेद तांदूळ खाऊ नये. यामुळे तांदळातील स्टार्च निघून जात नाही. त्यामुळे तांदूळ कायमच टोपात शिजवावा. टोपात शिजवल्यामुळे तांदळातील स्टार्च वाफेद्वारे निघून जातो. त्यानंतर तो भात खाण्यासाठी शरीराला फायदेशीर असतो. NCBI ने सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे भात शिजवून डायबिटिस रुग्ण देखील खाऊ शकतात.

​वजन कमी करणे

​वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी सफेद तांदूळच आतापर्यंत बेस्ट असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. ज्यामुळे वेट लॉस करण्यास मदत होते. बेली फॅट कमी करण्यासाठी भात उपयोगी ठरतो.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts