world news papua new guinea ambush 64 dead in tribal dispute enga

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Papua New Guinea: पापुआ न्यू गिनीत आदिवासी हिंसाचाराने (Violence) नरसंहाराचे रूप घेतलं आहे. नुकत्याच झालेल्या एका हिंसेत 60 लोकांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोर्सबी इथून 600 किलोमीटर दूर असलेल्या एन्गा (Enga) प्रांतात मृतदेहांचा खच आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इथल्या रस्त्यांवर, झाडाझुडपात मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होते. तांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याच्या खूणाही दिसत होत्या. पापुआ न्यू गिनीतील (Papua New Guinea) आदिवासी समुदायातील तीव्र संघर्षाचे हे बळी असल्याचं बोललं जात आहे. 

याआधीही नरसंहार
पापुआ न्यू गिनीत नरसंहाराची ही पहिलीच घटना नाही. गेल्यावर्षी जातीय हिंसाचारात जवळपास 150 नागरिकांची हत्या करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण प्रांतात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. या भीषण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. अंगावर शहारे आणणाऱ्या या व्हिडिओत लोकांना ट्रकच्या मागे बांधून अक्षरश: फरफटत नेलं जात होतं. 

पापुआ न्यू गिनीत का होते हिंसा?
पापुआ न्यू  गिनीतील डोंगराळ भागातील आदिवासी गट शतकानुशतके आपसात भांडत आहेत.  आता आधुनिक शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे हिंसाचार अनेक पटींनी वाढला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी SLR, AK-47, M4, AR15 आणि  M16 रायफल्स सारख्या शस्त्रांचा वापर केला होता.

डोंगराळ भागात हिंसेच्या अनेक घटना घडल्या आहेत. हिंसा रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून साम-दाम-दंड-भेद सर्व प्रकारचा वापर केला गेला. पण हिंसा थांबवण्यात सरकारला अपयश आलं. डोंगराळ भागात लष्कर तैनात करण्यात आलं आहे. 

पापुआ न्यू गिनीत 24 वर्षांखालील तरुणांची मोठी संख्या आहे आणि त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा. उपजीविकेचे संकट आलं की तरुण हिंसाचाराकडे वळतात. सर्व आदिवासी गट त्यांच्या अभिमानासाठी आपसात भांडतात. जमिनीच्या मालमत्तेपासून ते मैत्री आणि नातेसंबंधापर्यंतच्या वादांवरून रक्त सांडले जाते.

हिंसाचाराच्या बहुतांश घटना या ग्रामीण भागात घडल्यात. हल्ल्यात सामान्य नागरिकही भरडले जात आहे. गर्भवती महिला, लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसांचीही निर्दयीपणे हत्या केली जात असल्याचं समोर आलं आहे. हत्यापण अतिशय क्रुरपणे केली जाते. 

ऑस्ट्रेलयाचे पंतप्रधन अँथनी अल्बनीज यांनी पापुआ न्यू गिनीतील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. पापुळा न्यू गिनीतील नरसंहाराने संपूर्ण जग हादरलं आहे. अनेक देशांनी सुरक्षा पुरवण्याबाबत विचारणा केली आहे. 

Related posts