Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका वाढला असून काही भागांमध्ये तर, रक्त गोठवणारी थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर भारतामध्ये सुरु असणाऱ्या या थंडीमुळं शीतलहरी भारतातील उर्वरित राज्यांच्या दिशेनं वाहत आहेत. ज्यामुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाच मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी धुळ्यामध्ये 7.5 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांहूनही कमी नोंदवण्यात आलं.  महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसोबतच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. कोकणापासून गोव्याच्या किनारपट्टी भागापर्यंतसुद्धा हीच…

Read More