( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पोलिसांनी हरियाणाच्या एका ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी माजी क्रिकेटर आहे. त्याने हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळलं आहे. मृणांक सिंग असं या आरोपीचं नाव आहे. जुलै 2022 मध्ये त्याने ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख 53 हजारांची फसवणूक केली. त्यावेळी त्याने आपण आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत असल्याची खोटी बतावणी केली होती. तपासादरम्यान माहिती मिळाली की, आरोपीने आपण कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत देशभरातील अनेक लक्झरी हॉटेल मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली आहे. त्याने गंडा घातलेल्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर…
Read More