VIDEO: चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं, आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहिलं जातं. पण जेव्हा हाच देवदूत यमराजाचं स्वरुप घेतो, तेव्हा धक्का बसणं साहजिक असतं. उत्तर प्रदेशातील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत 18 वर्षांची मुलगी रुग्णालयाबाहेर तडफडत आपला जीव सोडत असल्याचं दिसत आहे. आजारी असल्याने दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार करण्यात आले, यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढलं. एखादं सामान सोपवावं तसं रुग्णालयाने मुलीला कुटुंबाकडे सोपवलं. तरुणी रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. …

Read More

मामा रुग्णालयाबाहेर गेला अन् तिने बाळाला जळत्या कचऱ्यात टाकलं; मन हेलावून टाकणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : झारखंडच्या (Jharkhand Crime) गढवा जिल्ह्यात एक अमानवीय घटना समोर आली आहे. नवजात अर्भकाला (newborn baby) कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. गढवा जिल्ह्यातील माझियान येथे स्थानिक रुग्णालयातील परिचारिकेने कचऱ्यासह नवजात बाळाला जाळले आहे. हे भयंकर कृत्य समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने आरोपी परिचारिकेसह आणखी एका महिलेवर कारवाई सुरू केली. स्थानिकांना ही घटना कळताच त्यांनी रोष व्यक्त केला आहे. गढवा येथील माझियान रुग्णालयात सहाय्यक परिचारिका निर्मला कुमारी आणि मंजू कुमारी यांच्यावर नवजात मुलाचा मृतदेह जाळल्याचा आरोप आहे. पलामू येथील 22 वर्षीय महिलेला…

Read More