साऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) DMDK founder Vijayakanth passes away : साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (DMDK) संस्थापक विजयकांत यांचे निधन झालं आहे. चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्युमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. डीमडीके पक्षाने विजयकांत यांच्या निधनानंतर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अभिनेता-राजकारणी आणि डीमडीके प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झालं आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि…

Read More