[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
केवळ आमटी ही रेसिपी ज्ञात
बऱ्याचदा डाळ भात एवढी एकच Dish बहुतांश लोकांना माहिती असते. खरेतर डाळी व कडधान्यांपासून अनेक वेगवेगळे प्रयोग करून, कितीतरी पदार्थ तयार केले जाऊ शकतात, ज्या तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकाल. जाणून घेऊयात कडधान्य व डाळीमध्ये कोणते विशिष्ट पोषक द्रव्ये असतात आणि त्यांचा आरोग्यास विशेष लाभ होतो व त्यांचा पाककृती मध्ये कसा समावेश करून घेऊ शकतो कविता देवगण, न्यूट्रिशनिस्ट, टाटा संपन्न यांच्याकडून.
बीन्स ब्रुशेटा
एक कप उकडलेला राजमा मॅश करून घ्या त्यामध्ये ३ टेबलस्पून दही घाला. तुमच्या आवडीप्रमाणे मसाले व हर्ब्स घाला. आता त्यामध्ये एक टीस्पून खोबऱ्याचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल, चिमूटभर राई, मीठ, ओरेगॅनो/बेसिल आणि मिरी पावडर घाला. हे सर्व मिश्रण मल्टिग्रेन ब्रेडवर पसरा, त्यावर एक लेट्युस, काकडी व टोमॅटोचे काप लावा. ग्रिल करून किंवा असेच देखील खाऊ शकता.
(वाचा – प्रोसेस्ड फूड ठरत आहेत अधिक धोकादायक, जाणून घ्या कारण)
डाळ टिक्की
३० ग्रॅम चणा डाळ भिजत ठेवा, ग्राइंडरमध्ये फिरवून घ्या. २० ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, मसाले, ३० ग्रॅम उकडलेला बटाटा किंवा वाफवून घेतलेला कॉलीफ्लॉवर त्यामध्ये मिसळा. सर्व मिश्रण एकजीव करून त्याच्या पॅटीज तयार करा व पॅनमध्ये भाजून घ्या. एक पॅटी बर्गर-बन्सच्या मध्ये ठेवून कोशिंबिरीसह याचा आस्वाद घ्या.
(वाचा – किचनमधील छोट्याशा काळ्या पदार्थाचे पाणी पिऊन नसांमधील चिकट घाण येईल बाहेर, Bad Cholesterol वरील रामबाण उपाय)
चवळीची सहजसोपी कोशिंबीर
अर्धा कप चवळी उकडून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी घाला. जिरे भाजून त्याची पावडर, मीठ, चाट मसाला घाला. वरून लिंबाचा रस घाला. यासोबत एक उकडलेले अंडे अवश्य खा.
(वाचा – डायबिटीसवर टॉनिकप्रमाणे काम करतात हे ५ ड्रिंक्स, सकाळीच प्याल तर शुगर राहील नियंत्रणात)
हैद्राबादी खट्टी दाल
एक कप तूरडाळीत तीन कप पाणी घालून शिजवून घ्या. चिमूटभर हळद, १ कप बारीक चिरलेला टोमॅटो, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, चिमूटभर लाल मिरची पावडर, २ हिरव्या मिरच्या मध्ये चिरा देऊन व चवीप्रमाणे मीठ घाला. १ टीस्पून चिंचेचा कोळ घालून पाच मिनिटे शिजवा.
फोडणीसाठी – २-३ लसणीच्या पाकळ्या, २ सुक्या लाल मिरच्या, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून राई, कढीपत्त्याची पाने हे सर्व १ टीस्पून तेलात घालून त्याची फोडणी डाळीवर घाला. वाफाळणारा भात व त्यासोबत ही तिखट आंबट डाळ अप्रतिम लागते.
हम्मस
एक कप हरभरे ४ ते ५ तास भिजवून ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये २ ते ३ शिट्या होईस्तोवर (किंवा हरभरे मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करता येईल इतपत मऊ होईपर्यंत) शिजवा. हरभरे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्यासोबत लसणीच्या ३ पाकळ्या, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, पाव कप तीळ व चवीप्रमाणे मीठ घालून मऊ पेस्ट करून घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून लिंबाचा रस आणि १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घाला. हम्मस नीट मिसळून घ्या. व्हेजी स्टिक्ससोबत किंवा क्रॅकर्सवर पसरून खा.
विशेष टीप
डाळी, कडधान्ये घेताना पॉलिश्डऐवजी अनपॉलिश्ड घ्या. अनपॉलिश्ड डाळी व कडधान्ये त्यांच्या सर्वात जास्त नैसर्गिक स्वरूपात असतात, त्यामध्ये प्रथिने व पोषक घटक कायम राखलेले असतात. सुट्या डाळी व कडधान्यांपेक्षा टाटा संपन्नसारख्या विश्वसनीय ब्रँडच्या डाळी व कडधान्ये घेणे नेहमी चांगले कारण त्यांचे पॅकेजिंग टॅम्पर-प्रूफ असते, त्यामुळे गुणवत्ता व पोषण या दोन्हींबाबत निश्चिंत राहता येते.
[ad_2]