[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शाजन सॅम्युअलने असे केले वजन कमी
रोज रात्री ९ वाजता झोपून पहाटे ४ वाजता उठणे, दिवसातून केवळ २ वेळा जेवण, आहारामध्ये कोणत्याही स्वरूपातील गोड पदार्थांना हात न लावणे, आठड्यातून ५ दिवस धावणे आणि २ दिवस हार्डकोअर व्यायाम, रोज जिने चढणे आणि अजिबात टीव्ही अथवा कोणत्याही प्रकारचा गॅझेट्सवर नेटफ्लिक्स, अमेझॉनवरील आकर्षिक करणारे शो न पाहणे याचे काटेकोरपणे पालन करत २५ किलो वजन शाजन सॅम्युअलने कमी केल्याचे सांगितले आहे.
साध्या टिप्स करा फॉलो
लठ्ठपणा कमी करायचा असेल तर साध्या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे असे शाजनने सांगितले. शरीराला वळण लावत वर दिलेल्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले तर वजन कमी होणे अशक्य नाही. गॅरेंटीने वजन कमी होईल असे ठामपणे त्याने सांगितले. इतकंच नाही तर भारतातील फिट इंडियाचा Brand Ambassador म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
(वाचा – डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांनी असे करा लसणाचे सेवन, नियंत्रणात येईल रक्तातील साखर)
अत्यंत साधी आणि रोमांचक कहाणी
शाजन सॅम्युअलची कहाणी अत्यंत साधी आहे. ३९ व्या वर्षी जेव्हा त्याला आपले लटकलेले पोट दिसले आणि ९४ किलो वजन हे अत्यंत त्रासदायक आहे ही जाणीव झाली तेव्हा त्याने वजन कमी करण्याचा दृढ निश्चय केला आणि साध्या सवयींना आपल्या आयुष्याचे उद्देश्य बनवले. शाजन सॅम्युअलच्या ट्विटर हँडलवर अनेक ठिकाणी याचा उल्लेख आहे.
(वाचा – पोटाची लटकलेली चरबी त्वरीत कमी करतील ३ योगासन, साईड फॅट्स होतील कमी पोट होईल सपाट)
लाईफस्टाईल बदलली
शाजन सॅम्युअलने वजन कमी करण्यासाठी आपली जगण्याची स्टाईल पूर्णतः बदलली. डाएट नियंत्रणात आणले आणि मग धावायला सुरूवात केली. आता त्याचे वजन ६८ किलो असून आतापर्यंत त्याने १८ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. फिट इंडियाच्या अनेक चेहऱ्यांपैकी भारतातील प्रमुख चेहऱ्यांपैकी तो एक ओळखला जातो.
(वाचा – शौचाला कडक होत असेल तर मलत्याग साफ होण्यासाठी काळ्या बी चा करा वापर, पोटातील घाण होईल साफ)
खाण्याच्या सवयींवर असा लगाम
शाजन सॅम्युअल पुण्याच्या एका चॅनेलमध्ये बिझनेस हेड म्हणून कार्यरत असताना कामाच्या निमित्ताने सतत बाहेर खात असे. मलाबार पराठा, डीप फ्राय चिकन, फास्ट फूड, ड्रिंक्स याचे अमाप सेवन केल्याने वजनावर परिणाम झाला होता. मात्र या दरम्यान कोणताही व्यायाम न केल्याने त्याने वजन ९४ किलो झाले होते. मात्र त्याने वजन कमी करून लोकांनाही प्रेरणा दिली नाही.
काय होते डाएट
शाजन सॅम्युअलने आपल्या डाएटमध्ये लिक्विड, केळं, स्मूदी, पाणी आणि संत्र्याचा समावेश सकाळी खाण्याचा केला. तसंच दोन वेळा जेवण योग्य आहे असंही त्याने सांगितलं. याशिवाय पेस्ट्री, केक, आईस्क्रिम, योगर्ट हे पदार्थ खाणे बंद केले. ९ वर्षांपासून त्याने साखरेला हातही लावला नाहीये. २ वेळा जेवणात सलाड, मल्टीग्रेन चपाती, ग्रील्ड फिश अथवा चिकन, सफलचंद आणि काही फ्रूट्सचा समावेश केला.
असा व्यायाम
रात्री ९ वाजता झोपून पहाटे ४ ला उठल्याने वर्कआऊटसाठी अधिक वेळ मिळतो. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करून चढून जाण्यावर भर. इतकंच नाही तर ३ तासात ७५० पायऱ्या चढण्याचा रेकॉर्डही सॅम्युअलच्या नावावर आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी शाजन सॅम्युअलकडून प्रेरणा घेऊन अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
[ad_2]