Morning Walk Health Benefits Empty Stomach; उपाशीपोटी सकाळी चालण्याचे जबरदस्त फायदे, ५ समस्या होतील छूमंतर तर मानसिक आरोग्यही सुधारेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मानसिक आरोग्यावर परिणाम

मानसिक आरोग्यावर परिणाम

रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही किमान अर्धा तास चाललात तर मानसिक आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते. सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रसन्न राहते. ताण, चिंता आणि नैराश्यापासून दूर राहण्यास मदत मिळते. आठवड्यातून किमान ५ दिवस मॉर्निंग वॉक करावे.

अनिद्रेपासून सुटका

अनिद्रेपासून सुटका

सध्या अनेक ताणतणावामुळे अनेकांना अनिद्रेची समस्याही निर्माण होते. मात्र सकाळी उपाशीपोटी चालल्यामुळे शरीराला योग्य व्यायाम मिळतो. त्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. याशिवाय मेंदू तरतरीत राहिल्याने आणि सकाळी उठून चालल्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने दिवसभर क्रिएटिव्हिटीसह काम पूर्ण होते.

(वाचा – पावसाळ्यात मका खाणं ठरू शकतं घातक, त्वचेपासून पोटापर्यंत आरोग्याचा वाजेल बँड)

नैराश्य करते दूर

नैराश्य करते दूर

तुम्ही सकाळी चालण्याचा व्यायाम सुरू केला तर यामुळे शरीरातील डोपामाईन नावाचे हार्मोन रिलीज होते, जे तणाव कमी करण्याचे काम करते. तसंच तुम्हाला नैराश्य येत असेल तर ते कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. शरीरातून निघणारे सेरोटोनिन हार्मोन हे तुमची झोप अधिक गडद बनवून तुमचा मूड चांगला राखण्यास मदत करते.

(वाचा – Fit India च्या सॅम्युअलचा २५ किलो वजन घटविण्याचा इंटरेस्टिंग प्रवास, प्रेरणादायक Weight Loss कहाणी)

मेनोपॉजच्या समस्येवरही तोडगा

मेनोपॉजच्या समस्येवरही तोडगा

हल्ली महिलांना कमी वयातच मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. मात्र सकाळी चालल्यामुळे मेनोपॉजची समस्या कमी करण्यास मदत होते. वास्तविक चालताना महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजेन हार्माेन रिलीज केला जाता. हे हार्मोन मेनोपॉजचे लक्षण असून थकवा, उदासीनता, तणाव इत्यादी दूर करण्याचे काम करते.

(वाचा – पोटाची लटकलेली चरबी त्वरीत कमी करतील ३ योगासन, साईड फॅट्स होतील कमी पोट होईल सपाट)

अनेक आजारांना ठेवते दूर

अनेक आजारांना ठेवते दूर

याशिवाय नियमित उपाशीपोटी चालण्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. तर हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास फायदा होतो. तसंच सांधेदुखीची समस्या दूर ठेवण्यास, मसल्स मजबूत करण्यासाठी, मेंदूचे कार्य अधिक चांगले करण्यासाठी चालण्याचा शरीराला फायदा मिळतो. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चालावे. १ तास चालण्यासाठी वेळ काढल्यास, अधिक उत्तम ठरते.

संदर्भ

https://www.ntu.ac.uk/about-us/news/news-articles/2022/11/exercising-on-an-empty-stomach-burned-70-more-fat,-study-found

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3119587/

https://www.metropolisindia.com/blog/preventive-healthcare/benefits-of-morning-walk/

[ad_2]

Related posts