Rajsthan Crime Mother strangulates innocent 14 year-old boy throat shocking reason revealed;आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, दृश्य पाहून बापाचे डोळे पाणावले, धक्कादायक कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajsthan Crime: आई ही आपल्या मुलांची जीवापाड काळजी घेत असते. त्यांना कोणतीच गोष्ट कमी पडू देत नाही. पण या नात्यावरील विश्वास उडवून टाकेल अशी घटना समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

येथे एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. 

या खळबळजनक प्रकरणाची माहिती मिळताच अंबामाता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आमची टीम या प्रकरणाचा प्रत्येक कोनातून तपास करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

आईने दाबला मुलाचा गळा 

पोलिसांनी मुलाचा मृतदेह महाराणा भूपाल रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. कारवाई करताना पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या आईला अटक केली आहे. दरम्यान घटना घडली तेव्हा महिलेचा पती घरी नव्हता. पोलिसांनी त्यांच्याकडेही चौकशी केली आहे. 

घटना घडली तेव्हा आपण मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो होतो त्यावेळी त्यांची पत्नी, मुलगा आणि आई-वडील घरी होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घडलेला प्रकार पाहून मुलाच्या वडिलांचे डोळे पाणावले. ते मुलाला उपचारासाठी नेऊ इच्छित होते पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता.

घटनेच्या दिवशी काय घडले?

आरोपी महिलेच्या पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी मीनाक्षी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून तिच्यावर गेल्या काही वर्षांपासून उपचार सुरू आहेत. 

यामुळे तिने कपड्याने मुलाचा गळा आवळून खून केल्याचे पतीने सांगितले.

मी मॉर्निंग वॉक करून घरी आलो तेव्हा गेट आतून बंद होते. शेजाऱ्यांच्या मदतीने मी बाल्कनीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, असे त्यांनी सांगितले.

वडिलांनी घरात काय पाहिले?

बायको घरात आरामात बसली होती आणि मुलाचा मृतदेह बेडवर थोडा दूर पडला होता. मुलाच्या मानेवर खुणा होत्या आणि त्याच्या जवळ 2 राशींचे तुकडे पडले होते, असे दृश्य तिच्या पतीने पाहिले.

यानंतर घरच्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपी आईची सखोल चौकशी सुरु आहे.

Related posts